हॉरर किलिंग! हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध, भररस्त्यावर वडील अन् भावाने…
20 वर्षांची आफरीन ही 12वीची विद्यार्थिनी होती. आफरीन एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडली होती. वडील आणि भावाने मिळून तिची हत्या केली.

Crime News : 20 वर्षीय मुलीचे एका हिंदू तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर वडील आणि भावाने बेदम मारहाण केली. बाजारपेठेतच ही घटना घडली. दरम्यान, मारहाण केल्यानंतर वडील आणि भाऊ तिला घरी घेऊन गेले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. पण पोस्टमार्टेम रिपोर्टमधून तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. 20 वर्षीय मुस्लिम मुलीचे हिंदू मुलावर प्रेम असल्याचे कळल्यानंतर तिला वडील आणि भावाने बाजारपेठेतच बेदम मारहाण केली.
वाचा >> असं काय घडलं की, राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ दिला? लोकसभेत झाला प्रचंड गोंधळ
मुलीच्या डोक्यावर गंभीर जखमा
हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील पिपरपूर पोलीस ठाणे हद्दीतील टिकावार गावातील आहे. 20 वर्षांची आफरीन ही 12वीची विद्यार्थिनी होती. मिळालेल्या माहितीनुसार, आफरीन एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडली होती. दोघेही सुलतानपूर येथील हनुमंत इंटर कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. 4 ऑगस्ट रोजी मुलीच्या वडिलांनी आणि भावाने आफरीनला त्याच मुलासोबत पाहिले. त्यानंतर बाजारात वडील आणि भावाने मिळून मुलीला बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मुलगी घरी जायला नव्हती तयार
आश्चर्याची बाब म्हणजे मारहाण झाल्यानंतरही मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत जायला तयार नव्हती, मात्र सुलतानपूर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर कुटुंबीय मुलीला घेऊन घरी गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच दिवशी रात्री मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची माहितीही गावकऱ्यांना मिळाली नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बाजारपेठेत मुलीला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
वडील आणि भावाविरुद्ध गुन्हा
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ऑनर किलिंग अंतर्गत मुलीचा मृत्यू झाल्याची चर्चा वेगाने सुरू झाली. त्यानंतर अमेठी पोलिसांनी गावातील चौकीदाराच्या तक्रारीवरून मुलीचे वडील आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून अमेठी प्रशासनाने 7 तारखेला मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले.
वाचा >> औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून भयंकर हत्याकांड! तरुणाला बेदम मारलं अन् जिवंत असतानाच फेकलं विहिरीत
त्यानंतर दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून मुलीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून आश्चर्यचकित करणारा खुलासा झाला आहे. ज्यामध्ये मुलीच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या असून तिची हत्या करण्यात आल्याचे कळते. शवविच्छेदनानंतर ही घटना उघडकीस आली.