मोठी बातमी: पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अतिक-अशरफची गोळ्या झाडून हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

अतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोलत असतानाच ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.’

ADVERTISEMENT

mafia atiq ahmed and his brother ashraf ahmed were shot dead while interacting with media in prayagraj
mafia atiq ahmed and his brother ashraf ahmed were shot dead while interacting with media in prayagraj
social share
google news

प्रयागराज: उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा चिंधड्या उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींची अशी हत्या करण्यात आल्याने उत्तर प्रदेश संपूर्ण देश हादरून गेला आहे. (mafia atiq ahmed and his brother ashraf ahmed were shot dead while interacting with media in prayagraj)

कशी झाली अतिक आणि अशरफची हत्या?

आरोपी अतिक आणि अशरफ यांना पोलीस आज (15 एप्रिल) वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. जेव्हा हे दोन्ही आरोपी समोर आले तेव्हा मीडियाच्या काही लोकांना त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवलं. त्याचवेळी अचानक अतिक आणि अशरफ यांच्यावत तीन जणांनी बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला झाला त्यावेळी दोघांना तपासणीसाठी नेले जात होते. पण गोळीबारात जागीच मृत्यू झालेल्या दोघांचेही मृतदेह आता मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शीच्या मते, जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी जय श्री रामचा नारा देखील ऐकू आला. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp