बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस
Gujarat Rape Case: एका विवाहित तरुणाने अविवाहित गर्लफ्रेंडसोबत बलात्कार करून तिच्यासोबत अत्यंत क्रूर असे कृत्य केलं आहे. जाणून घ्या नेमकी घटना काय घडली आहे.
ADVERTISEMENT

Married man has raped his unmarried girlfriend: सुरत: गुजरातमधील सुरतमधून (Surat) बलात्काराची (Rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की विवाहित व्यक्तीने आधी प्रेयसीवर (Girlfriend) बलात्कार केला. नराधम प्रियकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरचीची पूड टाकण्याचं भयंकर कृत्य केलं. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. (married boyfriend rape on girlfriend after that chili was put in the private part gujarat crime)
या घटनेनंतर तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाहित तरुणाने गावात राहणाऱ्या एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. सुरुवातीला दोघांमधील प्रेम हे खूपच गहिरं झालं होतं. तरुणी विवाहित तरूणाच्या प्रेमात सारं काही विसरून गेली होती.. पण त्यावेळी तिला माहीतच नव्हतं की, तिचा प्रियकर हा आधीपासूनच विवाहित आहे.
हे ही वाचा >> गर्लफ्रेंड म्हणाली ‘तू तर ‘नल्ला’, बॉयफ्रेंडने केलं अत्यंत भयंकर कृत्य!
पण काही दिवसांनी प्रेयसीला समजले की, तिचा प्रियकर निकुंज पटेल हा आधीच विवाहित आहे. तेव्हापासून प्रेयसीने आपल्या प्रियकरापासून दूर राहण्यास सुरुवात केली.
प्रेयसीसोबत क्रूर कृत्य
याच गोष्टीचा राग येऊन आरोपी निकुंजने थेट आपल्या प्रेयसीला गाठलं आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.. नराधम प्रियकराने त्यानंतर प्रेयसीवर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या क्रूरपणाची सीमाच गाठली. कारण थेट प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्याने लाल तिखट टाकून तिला भयंकर इजा पोहचवली. ज्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.