कुत्र्यामुळे झालेला पाणउतारा… मुंबईची अभिनेत्री थेट शारजाहच्या तुरुंगात : वाचा भयंकर बदल्याची गोष्ट
अभिनेत्री क्रिशन पेरारला (Krishan Pereira) ड्रग्ज प्रकरणात अडकविल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने 2 संशयितांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई : अभिनेत्री क्रिशन पेरारला (Krishan Pereira) ड्रग्ज प्रकरणात अडकविल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने 2 संशयितांना अटक केली आहे. क्रिशन परेरा ड्रग्ज प्रकरणात सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाह येथील तुरुंगात आहे. रवी बोभाटे आणि अँथनी पॉल असे दोघांचे नाव आहे. हॉलिवूडमध्ये काम देण्याचा शब्द देऊन या दोघांनी क्रिशन परेराला शारजाहाला पाठवलं आणि जाताना एक ट्रॉफी दिली, याच ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपविले होते, असा दावा करण्यात येत आहे. (Mumbai Crime Branch arrested two suspects in the case of actress Krishan Pereira drugs case, she lodged in Sharjah Jail)
याबाबत गुन्हे शाखेने दिलेली अधिक माहिती अशी की, अँथनी पॉल आणि रवी बोभाटे या दोघांनी मिळून क्रिशन परेराच्या आईचा बदला घेण्यासाठी या दोघांनी हा कट रचला. अँथनी पॉल काही वर्षांपूर्वी लॉकडाऊन दरम्यान क्रिशनच्या इमारतीत गेला होता, त्यावेळी क्रिशन परेराच्या कुटुंबीयांच्या घरात असलेल्या कुत्र्याने अँथनीच्या पॉलचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अँथनीने एका तुटलेल्या खुर्चीच्या मदतीने कुत्र्याला मारत दूर हटकण्याचा प्रयत्न केला. यावर क्रिशनची आई प्रमिला परेरा यांनी अँथनीचा पाणउतारा केला. यामुळे अँथनी दुखावला गेला. यानंतर त्याने रवी बोभाटेच्या सोबत मिळून हा कट रचला.
Crime : “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे” : मुलाने केलं प्रपोज; नकार देताच भररस्त्यात…
क्रिशन परेराच्या कुटुंबाने गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2023 मध्ये प्रेमिला परेरा यांना रवी नामक व्यक्तीकडून रिअल इस्टेट कर्जासाठी फोन आला. त्याने स्वतःची बिझनेसमन म्हणून ओळख करुन दिली. त्याच काळात तो कृष्ण परेराला भेटला होता, त्याने सांगितले की त्याने टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. रवी नावाच्या या व्यक्तीने क्रिशनला त्याच्या टॅलेंट पूल टीमशी ओळख करून देण्याची ऑफर दिली. मार्चमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी त्याच्या टीमशी क्रिशनची ओळख करून दिली. यात क्रिशनची निवडही झाल्याचं सांगण्यात आलं.