faraj malik: मलिकांच्या मुलाविरुद्ध गुन्हा, फ्रेंच मैत्रिणीचं प्रकरण काय?

nawab malik son faraj malik News : नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...
mumbai police registered case against Nawab malik son faraj malik
mumbai police registered case against Nawab malik son faraj malik

Faraj Malik Fraud Case । Mumbai police : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Ncp Leader Nawab Malik) यांचे पुत्र फराज मलिक (Faraj Nawab Malik) अडचणीत सापडले आहेत. फराज मलिक (Faraj malik) आणि त्यांच्या मैत्रिणीविरुद्ध कुर्ला पोलिसांनी (Kurla Police) गुन्हा दाखल केला आहे. व्हिसाची (Visa) मुदत वाढवण्यासाठी केलेल्या अर्जासोबत सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट असल्याचं समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कुर्ला पोलीस ठाण्यात फराज मलिक यांच्यासह त्यांच्या फ्रेंच मैत्रिणीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड विधानच्या कलम 420, 465, 468, 471, 341 यासह परदेशी नागरिक अधिनियम 1946 मधील कलम 14 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

mumbai police registered case against Nawab malik son faraj malik
Karachi विमानतळ दाऊदचा, D गँगला खुलेआम प्रवेश, वाचा झोप उडवणारी कहाणी

फराज मलिक यांचं प्रकरण नेमकं काय? (Faraj Malik son of Nawab Malik)

मिळालेल्या माहितीनुसार 2 मार्च 2022 ते 23 जून 2022 या कालावधीत कुर्ला मध्ये बनावट कागदपत्रं तयार केली गेली. या कागदपत्रांची अदलाबदली 2020 मध्ये केली गेली होती.

विशेष शाखा अधिकाऱ्याने यासंदर्भात कुर्ला पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितलं की, फराज मलिक आणि फ्रेंच महिला हॅमलिन यांच्यासह इतर काही लोकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mumbai police registered case against Nawab malik son faraj malik
'मी इस्लाम स्वीकारला, फातिमा बनले'; राखी सावंत लव्ह जिहादबद्दल काय बोलली?

हॅमलिन 2020 मध्ये भारतात आली होती. तिचा व्हिसा वाढवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. व्हिसा वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जासोबत बनावट कागदपत्र तयार करून जोडण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in