Murder Case : काकाने पुतण्याचा गळा चिरला, अन् गरोदर सुनेच्या पोटातच…
संपत्तीच्या वादातून काकाने पुतण्याची आणि त्याच्या गरोदर पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून हत्या केल्याने उत्तर प्रदेश हादरले आहे. काकाने पुतण्याच्या गरोदर पत्नीला झोपेत असतानाच हत्या करुन तो स्वतः पोलिसात हजर झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला होता.

Crime News : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद (Muradabad, Uttar Pradesh) जिल्ह्यात संपत्तीच्या वादावरुन (Dispute of wealth) काकाने पुतण्याची आणि त्याच्या गरोदर पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील भगतपूरमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती आरोपीने पोलिसात स्वतःहून हजर होत पोलिसांना सांगितली. काकाने सांगितलेल्या या घटनेमुळे पोलिसही चक्रावले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांची तपासणी करुन दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
आरोपी स्वतःहून पोलिसात
संपत्तीवरुन या कुटुंबामध्ये वारंवार वाद सुरु होते. त्यावरूनच काकाने पुतण्याचा गळा चिरुन आणि त्याच्या गरोदर पत्नीच्या पोटात चाकू भोसकून हत्या केली आहे. या घटनेला 4 तास ओलांडून गेल्यानंतर आरोपी पोलिसात स्वतः हजर झाला आणि घडलेला प्रकार सांगितला.
हे ही वाचा >> Ambernath Crime: मेव्हण्याने भाऊजीचं गुप्तांगच कापलं, कोयत्याने निर्घृण हल्ला; नेमकं काय घडलं?
अख्खं कुटुंब गुन्ह्यात
भगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परशुपुरा बाजे गावात झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काका-पुतण्याचा टोकाचा वाद
भगतपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील परशुपुरा बाजेमधील वरुण कुमार (वय 22) हा मोबाईलच्या दुकानात काम करत होता. तर त्यांचे वडील प्रबल सिंग आणि आई ममता यांचे आधीच निधन झाले होते. वरुणचे दोन वर्षांपूर्वी बबिता (वय 20) सोबत लग्न झाले होते. त्याच्या लग्नानंतर त्याच्या काकाबरोबर संपत्तीच्या कारणावरुन वारंवार वाद होत होते. त्या वादातूनच काकाने पुतण्या आणि त्याच्या पत्नीची हत्या केली आहे.
हे ही वाचा >> Crime: मुंबईतील वासनांध, धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेसोबत..
झोपेत असताना झाला हल्ला
प्रशांत हा एका खासगी शाळेत शिक्षक आहे. प्रशांत आणि वरुन या काका पुतण्यांची घरंही एकाच कॉम्प्लेक्समध्ये आहेत. मात्र त्यांच्यामध्ये संपत्तीच्या कारणावरुन वारंवार वाद होत होते. त्या वादाचे रुपांतर या दुहेरी हत्याकांडात झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, काका प्रशांत कुमार यांनी वरुण आणि त्याची गर्भवती पत्नी झोपेत असतानाच त्यांच्यावर हल्ला करुन त्यांची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.