अक्कू यादव प्रकरणात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेच्या नावाची चर्चा? नेमकं काय आहे प्रकरण

भाग्यश्री राऊत

तारीख होती १३ ऑगस्ट २००४…आरोपीला कोर्टात आणलं जाणार हे सर्व महिलांना माहिती झालं. कोर्ट परिसरात महिलांची गर्दी झाली…आरोपी पोलिस व्हॅनमधून उतरला, त्याच्यासोबत दोन पोलिसही होते. यावेळीही त्यानं परिसरातील एका महिलेला शिवी घातली. त्यामुळे महिला परत पेटून उठल्या. पोलिसांनी कसंतरी कोर्ट नंबर ७ मध्ये आरोपीला नेलं. पण, महिलांनी त्याला तिथंही मारहाण केली. त्याच्या अंगावर मिरची पूड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तारीख होती १३ ऑगस्ट २००४…आरोपीला कोर्टात आणलं जाणार हे सर्व महिलांना माहिती झालं. कोर्ट परिसरात महिलांची गर्दी झाली…आरोपी पोलिस व्हॅनमधून उतरला, त्याच्यासोबत दोन पोलिसही होते. यावेळीही त्यानं परिसरातील एका महिलेला शिवी घातली. त्यामुळे महिला परत पेटून उठल्या. पोलिसांनी कसंतरी कोर्ट नंबर ७ मध्ये आरोपीला नेलं. पण, महिलांनी त्याला तिथंही मारहाण केली. त्याच्या अंगावर मिरची पूड टाकली. इतकंच नाहीतर एका महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. जवळपास २०० महिलांनी त्या आरोपीला कोर्टातच ठार केलं होतं. तो गुंड आरोपी होता अक्कू यादव…

जगाला हादरवणारी घटना घडली होती नागपूरमध्ये

अख्ख्या जगाला हादरवणारी घटना घडली होती ती आपल्याच महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात…पण, आज ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका वेब सिरीजमध्ये हे अक्कू यादव प्रकरण दाखवलंय. त्यानंतर आता याच अक्कू यादव प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे, जो देशातील सर्वात मोठा नक्षलवादी होता, त्याचं नाव असल्याचा दावा केला जातोय. तर मिलिंद तेलतुंबडेच्या नावाची चर्चा का सुरू झाली? अक्कू यादव प्रकरणात त्याचा हात होता का? हे आपण जाणून घेणार आहोत.

नेमकं अक्कू यादव प्रकरण काय?

भरत कालीचरण उर्फ अक्कू यादव…नागपूरच्या कस्तुरबा नगर झोपडपट्टीतला एक गुंड…९० च्या दशकात कस्तुरबा नगरात त्यानं दहशत माजवली होती. १९९१ मध्ये पहिल्यांदा सामूहिक बलात्कारात त्याचं नाव पुढे आलं….त्याच्यावर खून, दरोडा, खंडणी, घरावर हल्ला, हल्ल्याची धमकी असे कितीतरी गुन्हे दाखल होते. त्याच्या या कृत्याविरोधात कोणी पोलिसांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना तो धमकावत होता. त्यानं वस्तीतील महिलांवर बलात्कार केले होते. यामध्ये १० वर्षांच्या चिमुकलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंतचा समावेश होता. तो इतका क्रूर होता, की एखाद्या महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करायचा. त्यामुळे कस्तुरबा नगर झोपडपट्टीत त्याची दहशत पसरली होती. त्याच्या भीतीमुळे मुली-महिला घरात लपून बसायच्या… एकदा त्यानं अंजनाबाई बोरकर यांची मुलगी आशाबाई यांच्यावर बलात्कार केला. इतकंच नाहीतर तिचे अवयव देखील कापले.

एका महिलेचं तिच्या नवऱ्यासमोर केलं होतं अपहरण

एका महिलेचं तिच्या नवऱ्याच्या समोर घरातून अपहरण केलं. तिच्या नवऱ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याने एका नववधूवर, एका बाळांतीण महिलेवरही बलात्कार केला होता. त्यानंतर त्या बाळंतीण महिलेनं स्वतःला रॉकेल ओतून पेटवून दिलं…त्याच्या या दहशतीमुळे कोणी त्याच्याविरोधात बोलण्याची हिम्मत करत नव्हता. त्यामुळे त्याची ही घाणेरडी कृत्य सुरूच होती. पण, ३० जुलै २००४ चा दिवस उजाडला आणि अक्कू यादवचे वाईट दिवस सुरू झाले. कस्तुरबा नगर झोपडपट्टीतल्या उषा नारायणे या सुशिक्षित तरुणीनं त्याच्याविरोधात आवाज उठवला. उषा ही एकटी महिला त्याच्याविरोधात लढू शकते, तर आम्ही का नाही? असा विचार करत वस्तीतले लोकही तिच्या सोबत उभे राहिले. लोकांनी अक्कूचं घर जाळलं. जमावाचा संताप पाहून अक्कू स्वतःचा बचाव व्हावा यासाठी त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याच्याविरोधात आधीच गुन्हा दाखल होता. त्याला ८ ऑग्स्टला एकदा न्यायालयात आणलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp