रत्नागिरी : बँकेतून निघाली पण…, आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसांनाही ‘शॉक’
चिपळूण तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. या मृतदेहावरून तरूणीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. कारण तरूणीच्या मृतदेहाच्या डोक्यावरची केस कापण्यात आले होते, भुवय्या देखील कापण्यात आल्या होत्या.
ADVERTISEMENT

चिपळूण तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. या मृतदेहावरून तरूणीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. कारण तरूणीच्या मृतदेहाच्या डोक्यावरची केस कापण्यात आले होते, भुवय्या देखील कापण्यात आल्या होत्या.जेणेकरून पोलिसांना तिची ओळख पटू नये. तसेच तरूणीवर बलात्कार करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी .या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.(neelima chavan missing death police investigate the case ratnagiri chiplun crime story)
चिपळूण तालूक्यातील ओमली येथील रहिवाशी असलेल्या या तरूणीचे नाव नीलिमा चव्हाण आहे. नीलीमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूने सध्या संपूर्ण चिपळूण हादरलं आहे. तिची ज्या पद्धतीने क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे, ते पाहून पोलिसांना सुद्धा घाम फुटला. अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला होता. पोलिस आता या प्रकरणात आता सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.
हे ही वाचा : Crime : विद्यार्थिनीचा पाठलाग, भररस्त्यात बलात्काराचा…; आरोपीची अटकेनंतर विकृती
निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या दापोली येथे कार्यरत होती. गेल्या महिन्याच्या शनिवारी 29 जुलै 2023 ला निलीमा चव्हाण दापोलीहून बॅँकेच्या शाखेतून घरी ओमळी चिपळुण येथे येण्यास निघाली होती. या प्रवासा दरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली होती. या दरम्यान साधारण दोन दिवस तर तिचा पत्ताचा लागला नव्हता आणि 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह आढळून आला होता.
या मृतदेहाच्या डोक्यावरील संपूर्ण केस नष्ट करण्यात आले होते, तिच्या भुवय्या देखील काढण्यात आल्या होत्या. अत्य्ंत वाईट अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावले होते. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याची माहीती आहे. त्याचसोबत नीलिमावर सामूहिक बलात्कार झाल्याचाही संशय आहे. नीलिमावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांनी संशय आहे.’