अरेरे… चिमुकल्याच्या जीभेऐवजी चक्क केलं प्रायव्हेट पार्टचं ऑपरेशन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

operation of private part instead of childs tongue hospital license suspended bareilly uttar pradesh story
operation of private part instead of childs tongue hospital license suspended bareilly uttar pradesh story
social share
google news

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मुलाच्या जीभेचे ऑपरेशन करण्याऐवजी त्याचा प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केल्याची घटना घडली आहे. कुटुंबियांनी मुलाच्या जीभेचे ऑपरेशन करण्यासाठी त्याला रूग्णालयात दाखल केले होते, मात्र आता त्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबिय चांगलेच संतापले असून त्यांनी रूग्णालयात राडा केला आहे. या घटनेची दखल आता उप मुख्यमंत्र्यांनी घेऊन 4 तासात रिपोर्ट मागवली आहे. तसेच बरेलीचे मेडीकल ऑफिसर डॉ. बलवीर सिंह यांनी रूग्णालयाचे लायसन्स रद्द करत, टीम गठीत करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. (operation of private part instead of childs tongue hospital license suspended bareilly uttar pradesh story)

मिळालेल्या माहितीनुसार, संजयनगर परीसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या अडीच वर्षाच्या मुलाला स्टेडीअम रोडवर असलेल्या डॉ.एम खान रूग्णालयात अॅडमीट केले होते. मुलाच्या जीभेचे ऑपरेशन करता यावे यासाठी त्यांनी त्याला रुग्णालयात भरती केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या जीभेचे ऑपरेशन करण्याऐवजी त्याच्या प्रायव्हेट पार्टचेच ऑपरेशन केल्याचा आरोप केला आहे. मुलाच्या लघवीच्या वाटेवर संक्रमन होत असल्या कारणाने आम्ही त्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केल्याचे स्पष्टीकरण रूग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. तसेच कुटुंबियांसोबत जीभेच्या ऑपरेशनबाबत कोणतीच बातचीत झाली नव्हती, असे देखील सांगितले आहे.

हे ही वाचा : आजी नातवाच्या मृतदेहाला सलग 10 दिवस घालत होती आंघोळ, बदलायची कपडे!

चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या अडीच वर्षाच्या मुलाला बोलण्यास अडचण व्हायची. त्याला नीट बोलताही येत नव्हते. यासाठी आम्ही मुलाला डॉ. एम खान हॉस्पिटलमधील डॉक्टरांना दाखवले होते. यावेळी डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र डॉक्टरांनी जीभेचे ऑपरेशन करण्याऐवजी त्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरशेन केल्याचा आरोप आता कुटुबियांनी केला. जेव्हा मी रूग्णालयात मुलाला भेटायला गेलो, त्यावेळेस बाथरूममध्ये नेताना त्याचा प्रायव्हेट पार्ट पाहिला आणि मला धक्काच बसला.डॉक्टरांना याबाबतची विचारणा केली असता, त्यांनी काही एक उत्तर दिले नाही. या घटनेची माहिती परीसरातील नागरीकांना देताच त्यांनी हॉस्पिटल गाठून तुफान राडा केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कागदपत्रावर कुटुंबियांची स्वाक्षरी

दरम्यान या राड्यानंतर मेडीकल ऑफिसर डॉ. बलवीर सिंह यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबत रूग्णालयाचे लायसेन्स देखील रद्द करण्याची कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी सुरु आहे. याचसोबत डॉक्टरांजवळ असलेल्या कागदपत्रावर, मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून त्यावर कुटुबियांची सही देखील आहे. तसेच जीभेचे ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे कोणतेच कागदपत्र नाही आहे.

चिमुकल्याचे कुटुंबिय हे जास्त शिकलेले नाही आहेत, अशात डॉक्टरांनी ज्या कागदपत्रावर सही करायला सांगितल्या, त्यावर त्यांनी सह्या केल्या आहे, असा आरोपी कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरु असून, फायन रिपो्र्ट हाती आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  ‘वहिनी’च्या प्रेमात झाला वेडापिसा, चिकन खायला देऊन बायकोचा काढला काटा!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT