Palghar Crime : जादूटोणा… महिलेवर पतीच्याच 5 मित्रांनी केला अनेक वेळा बलात्कार
पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याच्याच मित्रांनी मिळून महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरावरील वास्तू दोष आणि संकट दुर करण्याचा बहाण्याने आरोपींनी महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे.
ADVERTISEMENT

पालघरमधून (Palghar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याच्याच मित्रांनी मिळून महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरावरील वास्तू दोष आणि संकट दुर करण्याचा बहाण्याने आरोपींनी महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी आता महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व आरोपी हे महिलेच्या पतीचे मित्र आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. (palghar women rapeb by husband friend black magic rituals five arrested)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपींनी महिलेला तिच्या घरावर आणि पतीवर कुणीतरी काळी जादू केल्याचे सांगितले होते. या काळ्या जादूमुळेच महिलेच्या घरावर अनेक संकट येत होती. त्यामुळे या संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी आरोपींनी महिलेला काही उपाय आणि विधी सांगितल्या होत्या. हे उपाय करण्यासाठी आरोपींनी एप्रिल 2018 पासून महिलेच्या घरी जायला सुरुवात केली होती.
हे ही वाचा : NCP Crisis : ‘…मग आम्ही कोण?’ छगन भुजबळांनी केली शरद पवारांची कोंडी, थेटच बोलले
महिला ज्यावेळेस घरी एकटी असायची त्यावेळेस आरोपी घरात येऊन काळी जादू दर करण्याचा बहाणा करायचे. या दरम्यान आरोपी महिलेला पंचामृतच्या नावाखाली गुंगीचे औषध पाजायचे. त्यानंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचे. हा सर्व घटनाक्रम वारंवार सुरु होता.
आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी नवऱ्याला सरकारी नोकरी लागण्यासाठी आणि घरात शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी महिलेकडून तंत्र मंत्र करण्यासाठी सोन्याचे दागिने आणि पैसे देखील घेतले होते. यानंतर 2019 मध्ये आरोपींनी ठाण्याच्या येऊर जंगलात आणि कांदिवलीच्या मुख्य आरोपीच्या ठिकाणी आणि लोणावळ्याच्या एका रिसॉर्ट, असा अनेक ठिकाणी बोलावून महिसलेवर बलात्कार केला होता. आरोपींनी साधारण तंत्र मंत्रच्या नावाखाली महिलेकडून 2.10 लाख आणि दागिने घेतले होते.