तरुणीचा विनयभंग करून रिक्षाचालकानं 100 मीटर फरफटत नेलं; ठाण्यातील संताप आणणारी घटना
मुख्यमंत्र्याच्या शहरातच मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न एका घटनेमुळं उपस्थित झालं आहे. ठाण्यातील मार्केट परिसरात शुक्रवारी एका रिक्षा चालकाने 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला 100 मीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात पीडित तरुणी जखमी झाली आहे. हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना पाहून अनेकजण संताप व्यक्त […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्याच्या शहरातच मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न एका घटनेमुळं उपस्थित झालं आहे. ठाण्यातील मार्केट परिसरात शुक्रवारी एका रिक्षा चालकाने 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला 100 मीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात पीडित तरुणी जखमी झाली आहे. हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत.
आरोपीने केले अश्लील हावभाव; तरुणीचं धाडस
याबाबत अधिक वृत्त असे की, पीडित तरुणी ही एका महाविद्यालयात ११ वी मध्ये शिकते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ती बाजारपेठेतून पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालकही त्याठिकाणी होता. त्याने तरूणीकडे पाहून अश्लील हावभाव करत शेरेबाजी केली. तरूणीने धाडस दाखवित या रिक्षा चालकाला जाब विचारला. त्यावेळेस रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तरुणी जखमी झाली तर रिक्षा चालक फरार