Crime : दगडाने ठेचून मारण्यापूर्वी साक्षीसोबत कुणी ठेवले शारीरिक संबंध?
दिल्लीसह देशाला हादरवून टाकणाऱ्या शाहबाद डेअरी हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेल्या साक्षीसोबत हत्येपूर्वी शारीरिक संबंध ठेवले गेले होते, असं FSL रिपोर्टमधून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

Shahbad Dairy Case Sakshi murder : दिल्लीसह देशाला हादरवून टाकणाऱ्या शाहबाद डेअरी हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेल्या साक्षीसोबत हत्येपूर्वी शारीरिक संबंध ठेवले गेले होते, असं FSL रिपोर्टमधून समोर आलं आहे.
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 28 मे रोजी साक्षी नावाच्या मुलीची रात्री 8.30 वाजता तिच्या साहिल नावाच्या मित्राने हत्या केली होती. अनेक लोकांच्या समोर साहिलने तिची हत्या केली होती. साहिलने आधी साक्षीवर चाकूने वार केले आणि नंतर दगडाने ठेचून मारले.
हत्येपूर्वी मुलीशी ठेवण्यात आले होते संबंध
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरॅटरी अर्थात न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेच्या एका रिपोर्टने या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे. रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, हत्येपूर्वी साक्षीसोबत शारीरिक संबंध ठेवले गेले होते. म्हणजे हत्या झाली त्याच्या काही वेळ आधी तरुणीसोबत सेक्स केला गेला होता.
वाचा >> Crime : इंस्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बलात्कार अन्…, अल्पवयीन मुलीसोबत भयानक घटना
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, मुलीच्या योनीत मिळालेल्या नमुन्यानुसार हत्या करणाऱ्या साहिलचा या शारीरिक संबंधाशी संबंध नाही. त्यामुळे पोलिसांसमोर असा प्रश्न निर्माण झाला आहे की, हत्येपूर्वी तिच्यासोबत कुणी शारीरिक संबंध ठेवले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले गेले की सहमतीने, असा प्रश्नही आता या रिपोर्टनंतर निर्माण झाला आहे.










