12 तासात 2 खून, आता नाशकात पुण्याचा पॅटर्न... धडकी भरवणारे Video आले समोर

मुंबई तक

Nashik 2 Murder Case: नाशिकमध्ये अवघ्या 12 तासात दोन हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे संपूर्ण शहरात सध्या दहशत पसरली आहे.

ADVERTISEMENT

2 murders in 12 hours pune criminal pattern in nashik shocking video surfaced
नाशकात पुण्याचा पॅटर्न
social share
google news

प्रविण ठाकरे, नाशिक: अवघ्या 12 तासांच्या आत नाशिक शहरात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात एका तरुणाचा भर दुपारी खून केल्याची घटना घडली आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राशीद हारून शेख असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, इंदिरानगर परिसरातील सेल पेट्रोल पंपाच्या मागे ही घटना घडली आहे. सदर मयत व्यक्ती आणि संशयित आरोपी अंबड परिसरातील आहे. मागील वैमनस्यातून ही घटना घडल्याचे समजते. 

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. यावेळी जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणाला एका गोणीत भरून शासकीय रुग्णालयात नेलं. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने गुन्ह्यातील आरोपी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मृताच्या भावाने पोलिसांना याआधीही तक्रार केल्याची माहिती दिली पण आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगत पोलिसांनी त्याला सोडून दिल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा>> पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळ लंडनला पळाला, इंग्लंडमध्ये कोट्यावधींची माया जमवली; मुलाचंही तिकडेच शिक्षण सुरु

नाशिकमधील दुसरी हत्या

दुसऱ्या घटनेत 8 ते 10 मुलांचं टोळकं रस्त्यात गाडी अडवत पैसे मागणी करतो. त्यानंतर ते मारहाण करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळालं. 24 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या सातपूर भागात येथे एका 22 वर्षीय तरूणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली. हा तरुण सातपूर येथील एका कंपनीत कामगार होता. पार्थ पॅलेससमोर रात्री साडेदहा ते अकरावाजेच्या दरम्यान ही घटना घडली. जगदीश भैय्या वानखेडे असे या तरुणाचे नाव होते. हा तरुण मूळचा सटाणा या गावचा होता.

24 सप्टेंबर बुधवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर जगदीश हा आपल्या दुचाकीवरून सातपूर येथील आपल्या घरी जात होता. यावेळी काही गुंडांनी त्याला अडवत पैशांची मागणी केली. मात्र, जगदीशने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर कोयता आणि चाकूने सपासाप वार करत त्याचा खून केला. या हल्ल्यात जगदीशच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp