आयआयटी मुंबईतील 20 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

मुंबई तक

आयआयटी मुंबईतील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली आहे. बेडशीटच्या सहाय्याने फॅनला गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले. यामागे नेमकं कारण काय, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

IIT Mumbai Student Suicide
IIT Mumbai Student Suicide
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आयआयटी मुंबईतील 20 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

point

हॉस्टेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

IIT Mumbai Student Suicide : आयआयटी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 29 जुलैच्या मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात आणि आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेडशीटच्या सहाय्याने गळफास

मृत विद्यार्थ्याचे नाव सोहिल राजकुमार सांगवान (वय 20 वर्षे) असे असून तो आयआयटी मुंबईच्या मटिरिअल सायन्स (Material Science) शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सोहिल हा कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक 4 मधील खोली क्रमांक G-4147 मध्ये राहत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याने आपल्या वसतिगृहातील खोलीत छताच्या पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने फाशी घेऊन जीवन संपवले.

हे ही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा

तात्काळ धाव घेत पंचनामा

या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

हे ही वाचा : 'प्रधान हटवून यांनी पंतप्रधान वाचवला' अखिलेश यांचे भाषणात टॉन्ट, डिंपलही हसल्या

आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?

सोहिलने हे अत्यंत टोकाचे पाऊल का उचलले, यामागील मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्याच्या खोलीची तपासणी केली जात असून वसतिगृहातील मित्र आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. या आत्महत्येमागे शैक्षणिक ताणतणाव होता की अन्य काही वैयक्तिक कारणे होती, याचा शोध घेण्यासाठी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.