मुंबईत भरदिवसा तीन जणांचा खून, 54 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांना संपवलं!
Mumbai Crime: मुंबईतील ग्रँट रोड येथे एका व्यक्तीने आपल्याच पाच शेजाऱ्यांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ज्यामधील तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
Mumbai Attacks neighbors with knife: मुंबई: दक्षिण मुंबईतील (Mumbai) ग्रँटरोड (Grant Road) येथील एका निवासी इमारतीत शुक्रवारी एका 54 वर्षीय व्यक्तीने दिवसाढवळ्या शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल (24 मार्च) घडली. हल्ला झालेल्या पाच जणांपैकी तिघांचा मृत्यू (3 Killed) झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तात्काळ अटक केली. (3 killed 2 injured in mumbais grant road a 54-year-old man attacks neighbors with knife)
ADVERTISEMENT
मुंबईच्या ग्रँटरोडमधील थरकाप उडवणारी घटना
मुंबई पोलीस दलातील डीसीपी डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘ही घटना दुपारी 3.30 वाजता घडली. आम्हाला माहिती मिळाली की एक व्यक्ती हातात चाकू घेऊन इमारतीमध्ये अनेक लोकांवर हल्ला करत आहे. त्यानंतर आमची टीम तात्काळ तिथे पोहोचली. मात्र, तोपर्यंत आरोपीने 5 जणांवर हल्ला करून स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होते. खूप प्रयत्नांनंतर आम्ही त्याला पकडलं आहे. सध्या या हल्ल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.’
अधिक वाचा- नाशिक हादरलं… कंपनीच्या CEO ची भररस्त्यात गाडी अडवून निर्घृण हत्या
देशमुख यांनी पुढे सांगितलं की, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून चेतन गाला असे त्याचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचे कुटुंबीय त्याला सोडून गेले होते. यामुळे तो मागील अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. शेजाऱ्यांमुळेच घरच्यांनी आपल्याला सोडून गेल्याचा संशय आरोपीला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी चेतन याने हा भयंकर हल्ला केला.
हे वाचलं का?
मृतांची नावे
1. जयेंद्रभाई मिस्त्री, वय 77 वर्ष (पती)
2. इलाबाई मिस्त्री, वय 70 वर्ष (पत्नी)
3. जेनिल ब्रह्मभट्ट, 18 वर्ष
जखमींची नावे
1. स्नेहल ब्रह्मभट्ट, 44 वर्षे (अत्यंत गंभीर)
2. प्रकाश वाघमारे, वय 53 वर्षे (उपचार सुरू)
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Crime : प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं; मग दोघांनी पतीसोबत केलं असं काही की…
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ग्रँट रोडवरील पार्वती मॅन्शनमध्ये दुपारी साडेतीन वाजता ही भीषण घटना घडली. आरोपीची पत्नी आणि मुले दोन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेले होते. आपल्या बायको आणि मुलाला शेजाऱ्यांनीच भडकवल्याचा आरोपीला संशय होता. तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्यानंतर शुक्रवारी शेजाऱ्यांना पाहताच त्याने त्याच्या घरी जाऊन चाकू उचलला आणि शेजारच्या कुटुंबातील पाच जणांवर हल्ला केला. या प्रकरणी आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
अधिक वाचा- पिंपरी: भयंकर! झोपेतून उठवलं म्हणून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT