55 वर्षाची वासनांध महिला अल्पवयीन मुलाला न्यायची घरी अन् शारीरिक संबंध... नंतर जबरदस्तीने केली 'ती' गोष्ट
55-year-old woman physical relations with minor: एका अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून 55 वर्षीय महिलेने त्याला लग्नासाठी ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT

लखनऊ: प्रेम, विश्वासघात आणि ब्लॅकमेल... लखनऊमधील ही कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. सुमारे 7 वर्षांपूर्वी, एका अल्पवयीन मुलाने आणि 55 वर्षीय महिलेने शारीरिक संबंध ठेवले होते. असा आरोप आहे की, आजीच्या वयाच्या महिलेने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. नंतर त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याच्याशी लग्नही केले. आता, तो तरुण त्याचा जीव वाचविण्यासाठी याचना करत आहे. तो दावा करत आहे की, वृद्ध महिला आणि तिचे कुटुंबीय त्याचा अतोनात छळ करत आहेत. जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय.
वासनांध बेबी आणि अल्पवयीन मुलाची संपूर्ण कहाणी
लखनऊमध्ये एक अल्पवयीन मुलगा होता, तेव्हा 55 वर्षीय महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल केले. आता, तीच महिला आणि तिचे कुटुंब त्याला सतत त्रास देत आहेत. सादतगंज पोलीस स्टेशन परिसरातील मेहबूबगंज येथील रहिवासी असलेल्या तरुणाने यांनी सांगितले की, त्याच्या वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्याच्यावर आली होती. त्यामुळे त्याने अल्पवयीन असतानाच काम करण्यास सुरूवात केली होती. एका केटरिंगसोबत तो वेटर आणि इतर छोटी-मोठी कामं करत होता. याच काळात त्याची भेट बेबी नावाच्या एका 55 वर्षीय महिलेशी झाली, जी त्याच केटरिंग साईटवर काम करत होती.
हे ही वाचा>> 50 वर्षीय पुरुषाचे 40 वर्षीय महिलेशी होते प्रेमसंबंध, दोघेही दारू पित असताना वाद झाला, असं काय घडलं पुरुषाने मुंडकंच छाटलं
"मी अल्पवयीन असताना बेबीने माझ्याशी अनेक वेळा ठेवले शारीरिक संबंध..."
तरुणाने आरोप करताना म्हटलं की, 'बेबी माझ्याशी बोलू लागली. नंतर हळूहळू जवळीक वाढली. ती मला अनेक वेळा तिच्या घरी घेऊन गेली आणि तिथे ती माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची. मी त्यावेळी अल्पवयीन होतो आणि तिचा हेतू मला समजला नव्हता." तरुणाने पुढे असाही आरोप केला की, एक वर्ष शारीरिक संबंध ठेवल्यानंतर बेबीने त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिने त्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. ती अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि खोटे आरोप करत तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे त्याला एकदा तुरुंगातही जावं लागलं होतं.
हे ही वाचा>> झोपलेल्या पतीच्या अंगावर पत्नीनं ओतलं उकळतं तेल, नंतर टाकली चटणी.. मध्यरात्री नुसता राडा!
"बेबीचे आधीच झालेली दोन लग्नं"
असा आरोप आहे की, बेबीने एके दिवशी तरुणाला न्यायालयात नेले आणि त्याची पत्नी असल्याचा दावा करत नोटरी कागदपत्रावर सही करायला लावली. पण तिचे आधीच दोनदा लग्न झाले होते आणि तिला तीन मुलेही होती, जी सर्व तरुणापेक्षा मोठी होती. तरुण म्हणाला, "लग्नानंतर, ती मला माझ्या आई आणि भावाला भेटू देत नव्हती. जर मी घरी गेलो तर ती मला शिवीगाळ करायची आणि मला धमकी द्यायची की, तिच्या मुलांकरवी ती मला जिवे मारेल." अनेक वर्षे हा छळ सहन केल्यानंतर, तरूण अखेर बेबीपासून वेगळा झाला. पण वेगळे झाल्यानंतरही बेबी आणि तिचे कुटुंब त्याला एकटे सोडत नाही.