पालघर हादरलं! आश्रम शाळेतील 2 विद्यार्थ्यांची कपडे सुकवण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

Palghar Crime : पालघर हादरलं! आश्रम शाळेतील 2 विद्यार्थ्यांची कपडे सुकवण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आश्रम शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं

point

विद्यार्थ्यांची कपडे सुकवण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

Palghar Crime : पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय आहे. वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देविदास परशुराम नावळे इयत्ता दहावी (रा. मूळचा मोखाडा बीवळपाडा) आणि मनोज सिताराम वड इयत्ता नववी (रा. दापटी) अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

कपडे सुकवण्याच्या दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं 

अधिकची माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कपडे सुकवण्यासाठी ठेवलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय येण्याआधीच शाळा प्रशासनाने मृतदेह खाली उतरवल्याने कुटुंबीयांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच  जव्हारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक आणि पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असलं तरी यामुळे संबंधित विभागांवर मात्र आता पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. 

हेही वाचा : मुंबई : उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन् कामावर निघालेल्या तरुणीच्या डोक्यावर पडली, रुग्णालयता नेताच...

खासदार हेमंत सावरा काय म्हणाले? 

याबाबत बोलताना पालघरचे खासदार हेमंत सावरा म्हणाले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतली आहे. सर्वांसमक्ष व्हिडीओ क्लिप करुन त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. परंतु, दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाला पाहिजे. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी ताबोडतोब गुन्हा दाखल व्हावा. यासाठी सुद्धा कारवाई सुरु करण्यात आली आहे. या अनुषंगाने विद्यार्थी आणि त्यांचं वसतिगृह याबाबत धोरण आखणे गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp