रासायनिक टँकरची सिलिंडरने भरलेल्या वाहनाला धडक, 200 सिलिंडरचा मोठा स्फोट, पाच वाहने जळून खाक आणि...
jaipur cylinder blast : एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर होऊन टँकरच्या केबिनमध्ये मोठी आग लागली. अशा स्थितीत आगीने 200 सिलिंडरचा पेट घेतल्याने लागोपाठ स्फोट झाला आणि परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर

200 सिलिंडरचा पेट घेतल्याने लागोपाठ स्फोट
jaipur cylinder blast : एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर होऊन टँकरच्या केबिनमध्ये मोठी आग लागली. अशा स्थितीत आगीने 200 सिलिंडरचा पेट घेतल्याने लागोपाठ स्फोट झाला आणि परिसर हादरून गेला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 वाहने जळुन खाक झाली आहेत. ही घटना जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेनं संपूर्ण जयपूर हादरून गेलं आहे.
हे ही वाचा : तरुणीचा प्रियकरावर जडला जीव, कुटुंबीय म्हणाले परत या लग्न लावून देऊ, पाच भावांनी मिळून... सैराटपेक्षा धक्कादायक शेवट
पाच वाहने जळून खाक
या अपघातात पाच वाहने पार्क करण्यात आली होती ती, या अपघातात जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प पडली होती. बुधवारी पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास संबंधित महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला होता.
सिलिंडर 500 मीटर अंतरावर शेतात पडले
स्फोटकानंतर काही सिलिंडर 500 मीटर अंतरावर शेतात पडल्याचं दिसून आले. 10 किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. हा स्फोट सुमारे दोन तास सुरु होता. या स्फोटात एक व्यक्ती जळाली आणि त्याचा मृत्यू झाला. तीन तासानंतर 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी स्फोटामुळे झालेली आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं. संबंधित टँकरमध्ये तब्बल 330 सिलेंडर असल्याचा अंदाज आहे. या एकूण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : जामखेडमधील कलाकेंद्रावर टोळक्याचा हल्ला, विनयभंग करत खंडणीची मागणी; चौघांवर गुन्हा दाखल
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकाने सांगितलं की, आरटीओ गाडी पाहून टँकरचालकाने गाडी ढाब्याकडे वळवली. तसेच त्यानंतर गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला धडकली आणि नंतर होत्याचं नव्हतं होऊल बसलं. या घटनेनं संपूर्ण जयपूर हादरून गेलं आहे.