घर बांधण्यासाठी सासरच्यांकडून 2 लाख रुपयांची मागणी, महिलेवर सुरुच होता छळ, शेततळ्यात उडी घेत स्वत:ला संपवलं

मुंबई तक

chhatrapati sambhajinagar crime : छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं शेततळ्यात उडी मारत आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील नांदर गावातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

chhatrapati sambhajinagar crime
chhatrapati sambhajinagar crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना

point

महिलेचं शेततळ्यात उडी घेत टोकाचं पाऊल

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं शेततळ्यात उडी मारत आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील नांदर गावातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव राधा संतोष शेळके (वय 22) असे आहे. त्या सुंदरवाडी झाल्टा येथील रहिवासी आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : नाशिक हादरलं! कंटाळा आला म्हणून तरुणाने आईची केली हत्या, नंतर स्वत:च पोलीस ठाण्यात झाला सरेंडर

घर बांधण्यासाठी पीडितेला 2 लाखांची मागणी 

महिलेला दोन अपत्य आहेत,सरुवातीला महिलेला तिच्या सासरी कसलाही त्रास झाला नाही. पण, नंतर महिलेला घर बांधण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अशा परिस्थितीत वडिलांनी आर्थिक परिस्थिती अगदीच हलाकीची असल्याने राधिकाने पैसे देणं सासरच्यांना टाळल्याचं सांगण्यात येत आहे. 

सासरच्यांचा छळ आणि महिलेचं टोकाचं पाऊल 

सासू कमलाबाई शेळके, दीर राजेंद्र शेळके, जाऊबाई निकीता राजेंद्र शेळके आणि नणंदबाई जनाबाई अमोल राठोड या सासरच्या मंडळींनी पीडित सूनेचा छळ केला. त्यांनी केलेल्या छळाच्या त्रासाला कंटाळून राधाने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांना दिली. 

हे ही वाचा : पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर बॉयफ्रेंडची हत्या, नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून...

संबंधित घटनेनंतर माहेरच्या मंडळींसह पैठण येथील एका शासकीय रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला. या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्यास शवविच्छेदन होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. या भूमिकेनं वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात पोलिसांनी समजूत काढल्यानंतरच शवविच्छेदन करण्यात आलेय परिस्थिती लक्षात घेता. पोलिसांचा बंदोबस्तातच अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पाचोडा पोलीस ठाण्यात मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गु्न्हा नोंदवण्यात आला आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp