आजी नातवाच्या मृतदेहाला सलग 10 दिवस घालत होती आंघोळ, बदलायची कपडे!
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत एक आजीबाई तिच्या मृत नातवाला तब्बल 10 दिवस अंघोळ घालत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही घटना उघड़कीस आली आहे. या घटनेने पोलीस देखील हादरले आहेत.
ADVERTISEMENT
देशात गेल्या काही वर्षापासून धक्कादायक हत्याकांडाची मालिका सुरु झाली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड असो किंवा दिल्लीतील साक्षी हत्याकांड, त्यानंतर मीरा रोडमधील सरस्वती हत्याकांड आणि आता दर्शना पवार हत्याप्रकरण…या सर्व घटनांनी संपूर्ण देश सुन्न झाला असतानाच आता पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत एक आजीबाई तिच्या मृत नातवाला तब्बल 10 दिवस अंघोळ घालत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही घटना उघड़कीस आली आहे. या घटनेने पोलीस देखील हादरले आहेत. (65 years old women was living with grandson dead body barabanki uttar pradesh crime story)
ADVERTISEMENT
मोहरीपुरवा मोहल्ल्यात एक 65 वर्षीय वृद्ध महिला राहत होती. या वृद्ध महिलेसोबत तिचा 18 वर्षाचा प्रियांशू हा नातू राहत होता. वृ्द्ध महिलेच्या घरातून गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती. या संबंधित तक्रारी शेजारी करत होती. या तक्रारीनंतर शेजाऱ्यांना संशय झाला आणि त्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली. शेजाऱ्यांच्या तक्रारी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी दरवाजा उघडताच त्यांना मोठा हादराच बसला. कारण वृद्ध महिला ही तिच्या नातवाच्या मृतदेहाला अंघोळ घालत होती. या नातवाचा मृतदेह पुर्णतं सडला होता, तसचे त्यामधून किडे देखील बाहेर पडत होते आणि दुर्गंधी येत होती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पाहताच त्यांना उलट्या झाल्या होत्या.
हे ही वाचा : लग्न घरी रक्ताचा सडा! नवरदेव-नवरीच्या गळ्यावर फिरवला चाकू, 5 जणांना झोपेतच संपवलं
शेजाऱ्यांनी आजीचे मानसिक संतुलन ठिक नसल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ महिलेल्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. तसेच वृद्ध आजीने नातवाचे 10 दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. पण त्याचा मृत्यू कसा झाला, याची माहिती त्यांनी दिली नाही. पोलिसांनी आता मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. मुलाचा नेमका मृत्यू कसा झाला आहे? याची प्राथमिक माहिती मिळू शकली नाही आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर याबाबतचा खुलासा होणार आहे.
हे वाचलं का?
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध आजीच्या घरात मिळालेला मृतदेह हा तिच्या नातवाचा आहे. प्रियांशू असे 18 वर्षीय तिच्या नातवाचे नाव आहे. प्रियांशुच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले होते. या निधनानंतर प्रियांशू त्याच्या आजीसोबत राहायचा. तसेच प्रियांशू यांचा कसा मृत्यू झाला, याची शेजाऱ्यांना देखील माहिती नाही आहे.
दरम्यान आता पोलिसांनी 18 वर्षीय प्रियांशूचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आता प्रियांशूचा मृत्यूचा खुलासा होणार आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टची पोलिसांना प्रतिक्षा आहे. या घटनेने सध्या उत्तर प्रदेश हादरले आहे. या घटनेचा तपास पोलीस करतायत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Kolhapur : बलात्कार प्रकरण अन् पत्नी, मुलाला पाजले विष; स्वतःचा चिरला गळा!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT