उंदराच्या हत्येनंतर आता सापाच्या खुनाचा खटला, Video झाला व्हायरल
Snake Murder Case : उत्तर प्रदेशमध्ये एका सापाच्या (Snake Case) हत्येची घटना समोर आली आहे. या घटनेत काही तरूणांनी मिळून एका सापाची हत्या केली होती. या संपूर्ण घटनेचा नंतर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ADVERTISEMENT
Snake Murder Case : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) काहीच दिवसांपुर्वी एका उंदराच्या हत्येच प्रकरण समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता एका सापाच्या (Snake Case) हत्येची घटना समोर आली आहे. या घटनेत काही तरूणांनी मिळून एका सापाची हत्या केली होती. या संपूर्ण घटनेचा नंतर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर वनविभागाने संबंधित हत्या प्रकरणातील आरोपीवर कारवाई केली आहे. (a boy killed a snake and buried 80 eggs in the ground video viral)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुजफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नागिनीच्या हत्या करण्यात आली होती. या नागिनीच्या हत्येसह तिच्या 80 अंड्याना जमिनीत गाडण्यात आले होते.या घटनेची खबर वनविभागाला लागली होती. त्यानुसार वनविभागाने संबंधितांविरोधात तक्रार दाखल करून कारवाई केली.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला होता. या व्हिडिओत एका बादलीत नागिन आणि दुसऱ्या बादलीत अंडे ठेवण्यात आले होते. या अंड्याची संख्या 80 असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच वनविभाग अॅक्शन मोडवर आले होते.
हे वाचलं का?
हे ही वाचा : विषारी सापांची झुंड अन् एकटा तरूण.. ‘हा’ Video तुम्हीही बघू शकणार नाही!
मुज्जफरनगरच्या रोनी हाजीपूर गावात आबाद नावाचा मुलगा राहतो. या मुलाच्या घरात एक साप आढळला होता. या सापाला घाबरून त्याने त्याला मारून टाकले होते. त्यानंतर त्याने घरात आणखीण तपासणी केली असता त्याला 80 अंडे सापडली होती. हे अंडे पाहून तो खुपच घाबरला होता. त्यामुळे आता या अंड्याचं करायचं काय असा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे त्याने या अंड्याना (Snake eggs) जमीनीत गाडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान नागिनीला मारताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकाने त्याचा व्हिडिओ देखील बनवला होता, हा व्हिडिओ त्याने इंटरनेटवर टाकला होता. या व्हिडिओमुळे तरूण अडचणीत सापडला होता.
सापाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तपासाला सुरुवात केली होती. वनविभागाने या घटना प्रकरणात तत्काळ तपासाला सुरुवात करत आबाद सह दोन जणांना ताब्यात घेतले. तसेच वनविभागाने वन्यजीव गुन्ह्याच्या कलम 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान आता या प्रकरणात वनविभागाने जमीनीत गाडलेल्या या अंड्याचा शोध घेतला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या या घटनेची खुप चर्चा आहे. या घटनेने संपुर्ण गाव देखील हादरलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT