Alibaug Crime : आईवर कोयत्याने वार, अंगणात जिवंत जाळलं; उच्चशिक्षित तरूणाचं राक्षसी कृत्य

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

a boy killed Stabbed in the head mother and burned alive alibaug revdanda crime story
a boy killed Stabbed in the head mother and burned alive alibaug revdanda crime story
social share
google news

Alibaug Crime Story : अलिबाग (Alibaug) तालूका पुन्हा एकदा गुन्ह्याच्या घटनेने हादरला आहे. बुधवारी एका सख्ख्या भावाने अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळवण्यासाठी आणि मालमत्तेसाठी दोन सख्ख्या बहिणींना सूपमधून विष देऊन त्यांची हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता एका उच्चशिक्षित मुलाने जन्मदात्या आईची क्रुरतेने हत्या केल्याची घटना घडली आहे. चांगुणा खोत (55) असे या मृत महिलेचे नाव आहे. जेवण देण्यास नकार दिल्याने मुलाने आईची हत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी (Police) आरोपी मुलगा जयेश खोत (25) याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (a boy killed Stabbed in the head mother and burned alive alibaug revdanda crime story)

अलिबाग तालुक्यातील नवखार येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेत जेवण न दिल्याचा राग मनात ठेवून मुलाने आईची निर्घृण हत्या केली आहे. आईने जेवण न दिल्याने मुलगा जयेश खोतला राग अनावर झाला. या रागातून जयेशने आईच्या डोक्यात कोयत्याने वार केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाल्या होत्या. जयेश इतक्यावरच थांबला नाही तर त्याने रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडलेल्या आईला फरफरट अंगणात नेले. यानंतर त्याने पालापाचोळा गोळा करून तिच्या अंगावर टाकत तिला जिवंत पेटवून दिले होते.

हे ही वाचा : Manoj Jarange : “आम्हाला नाटक…”, सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगे संतापले

घराबाहेर आग लागल्याचे पाहताच स्थानिकांनी तत्काळ आग विझवून जयेशची आई चांगुणा खोत यांना रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिला आहे. या घटने दरम्यान आरोपी मुलगा हा घटनास्थळीच उभा होता. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. जयेश खोत हा उच्चशिक्षित तरूण आहे, त्याने आयटीआयचे शिक्षण पुर्ण केले आहे. मात्र नोकरी नसल्याने तो घरीच असतो. तर त्याचा एक भाऊ गतिमंद आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणी वडील नामदेव खोत यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी मुलगा जयेश खोतला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्रे ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेने सध्या अलिबाग हादरलं आहे.

हे ही वाचा : पोलिसांने केलं असं काही की अंगावर येईल काटा! सापाचा तोंडाने CPR देऊन वाचवला जीव, Video व्हायरल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT