लक्ष्मी पूजन करत होती AAP ची महिला नेता, तेव्हाच पतीने झाडल्या गोळ्या!

ADVERTISEMENT

Aam Aadmi Party leader Ruchi Gupta was shot by her husband Sandeep Thakur
Aam Aadmi Party leader Ruchi Gupta was shot by her husband Sandeep Thakur
social share
google news

Crime News: दिवाळीनिमित्त आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) नेत्या रुची गुप्ता (Ruchi Gupta) या त्यांच्या फिटनेस सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांसह लक्ष्मीपूजन करत होत्या. त्याचवेळी त्यांचा पती हातात पिस्तूल घेऊन तेथे पोहोचला आणि त्याने गोळीबार केला. त्या गोळीबारामध्ये (Firing) दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे त्यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. शहरातील मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने दिवसभर या घटनेची जोरदार चर्चा केली जात होती.

फिटनेस सेंटरमध्येच गोळीबार

शहराच्या मध्यभागी असलेले रिव्हिटल मंत्रा फिटनेस सेंटर आणि ब्युटी केअर हे आम आदमी पार्टीच्या राज्य उपाध्यक्षा रुची गुप्ता यांच्याकडून चालवले जाते. रविवारी दिवाळीनिमित्त रुची गुप्ता त्यांच्या फिटनेस सेंटरमध्ये लक्ष्मीपूजन करत होत्या. त्याचवेळी रुची गुप्ता यांचे पती संदीप ठाकूर तेथे पोहोचला होता. त्यावेळी फिटनेस सेंटरचे कर्मचारीही तिथे उपस्थित होते. मात्र यावेळी संदीप ठाकूरकडे पिस्तूल असल्याने अनेक जण घाबरले होते. त्यानंतर तिथेच काही कारणावरून संदीप ठाकूर यांच्याबरोबर वाद सुरु झाला. त्या वादानंतर संदीप ठाकूर यांनी हातातील पिस्तुलने गोळीबार करत दोन कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे.

हे ही वाचा >> पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र येणार का? गोविंद बागेत पाडव्याची जय्यत तयारी पण…

संदीप ठाकूर फरार

रुची गुप्ता यांचे कर्मचारी निखिल शर्मा आणि उज्ज्वल त्यागी या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यानंतर संदीप ठाकूरला पकडण्याचा उपस्थित कर्मचाऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यावेळी पळून गेला. त्यानंतर या घटनेची माहिती तातडीने विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल होत दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मतभेद सांगण्यास नकार

या प्रकरणी रुची गुप्ता हिने आजतकशी बोलताना सांगितले की, तिचे पतीसोबत काही मुद्द्यावरून मतभेद होते. संदीप ठाकूर पूजाजवळ पोहचला होता. त्यावेळी त्याने अचानक गोळीबार सुरु केला. यावेळी रुची गुप्तावर त्याला गोळ्या झाडायच्या होत्या की, आणखी कोणावर ते मात्र समजू शकले नाही. यावेळी रुची गुप्ताने मात्र पतीसोबतच्या मतभेदाचे कारण सांगण्यास नकार दिला. या प्रकरणी विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अनुराग प्रकाश यांनी आजतकला सांगितले की, संदीप ठाकूरविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली त्यांच्या तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोण आहेत गुप्ता

रुची गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर ग्वाल्हेर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक लढवली आहे. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षाचेही काम करत होत्या. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी महिला जिल्हाध्यक्षपदही भूषवले होते. मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंनीच मला गुहागरमधून पाडलं’, कदमांनी सांगितली Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT