अब्दुल 2 हँड ग्रेनेड घेऊन निघालेला राम मंदिरात, घडवणार होता विध्वंस; पण...
अयोध्या राम मंदिरावर हँड ग्रेनेडने हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या या घटनेबाबत सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हँड ग्रेनेडने अयोध्यातील राम मंदिरावर हल्ल्याचा कट

दहशतवाद्याला हँड ग्रेनेडसह एटीएसने पकडलं

दोन जिवंत हँड ग्रेनेड पोलिसांनी केले निकामी
अयोध्या: अयोध्या राम मंदिर हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे लक्ष्य आहे. आयएसआय राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत आहे. प्रत्यक्षात, गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि फरिदाबाद स्पेशल टास्क फोर्सने अब्दुल रहमान नावाच्या व्यक्तीला फरिदाबाद येथून अटक केली आहे. 19 वर्षीय अब्दुल हा फैजाबादचा रहिवासी आहे. अब्दुल राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचत होता. पण वेळीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्याकडून दोन हातबॉम्बही जप्त करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही हातबॉम्ब तात्काळ निष्क्रिय केले आहेत.
असे सांगितले जात आहे की, अब्दुल हँडग्रेनेडने राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचत होता. तो बराच काळ पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. आयएसआय त्याला राम मंदिरावर हल्ला करण्यासाठी तयार करत होतं. अब्दुल रहमान अनेक कट्टरपंथी गटांशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे. तिथून तो आयएसआयच्या संपर्कात आला आणि दहशतवादी कटात सहभागी झाला, असे मानले जाते.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Murder : क्रूरतेचा कळस! संतोष देशमुखांची अमानुष हत्या, सर्वात धक्कादायक फोटो आले समोर
अब्दुल रहमानने केलेली राम मंदिराची रेकी
मिळालेल्या माहितीनुसार, तपासात असे दिसून आले आहे की अब्दुल रहमानने आयएसआयच्या सूचनेनुसार राम मंदिराची रेकी केली होती. त्याने राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती आयएसआयलाही दिली होती.
असे सांगितले जात आहे की, अब्दुलची योजना राम मंदिरावर हँडग्रेने हल्ला करण्याची होती. योजनेनुसार, त्याला राम मंदिरावर हातबॉम्बने हल्ला करायचा होता आणि तेथे मोठ्या प्रमाणात विंध्वस करायचा होता. पण सुदैवाने त्याआधीच, गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्तचर माहितीमुळे अब्दुलला अटक करण्यात आली.