डॉक्टर की सैतान! मरणयातना भोगणाऱ्या एचआयव्ही पेशंटला अमानुष मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

accident victim beaten up by junior doctor not telling that he was suffering from hiv
accident victim beaten up by junior doctor not telling that he was suffering from hiv
social share
google news

MP News : इंदौरमधील महाराजा यशवंतराव रुग्णलयातील (Maharaja Yashwantrao Hospital) एका ज्युनियर डॉक्टरचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून त्याचे निलंबन करण्यात आले आहे. त्या व्हिडीओमध्ये एका एडसबाधित रुग्णाला मारहाण केली आहे. रुग्णालयाला मारहाण केल्याचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टराचे निलंबन(Suspension of Doctor) करण्यात आले आहे. अपघात होऊन एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाला होता. त्या अपघातात त्याचा पाय मोडला होता. अपघातानंतर त्याला आधी उज्जैनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एमवायएचमध्ये त्याला हलवण्यात आले आहे. (accident victim beaten up by junior doctor not telling that he was suffering from hiv)

उपचार आधी मारहाण

एमवायएच रुग्णालयाचा ज्युनियर डॉक्टर आकाश कौशलने अपघाग्रस्त रुग्णावर उपचार सुरु केले होते. त्यावेळी तो रुग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांनी आधी त्यांच्या कुटुंबीयांवर राग काढला होता. तर त्यानंतर त्या रुग्णाला तो वारंवार मारताना त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो डॉक्टर शिवीगाळही करत आहे. रुग्णालयातील ही घटना व्हिडीओतून व्हायरल होताच एमवायएच रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रमेंद्र ठाकुर यांनी त्या ज्युनियर डॉक्टरला तात्काळ निलंबित केले आहे.

हे ही वाचा >> Gadchiroli Crime : 5 जणांच्या हत्याकांडात सूनेच्या मित्राची एन्ट्री, तपासात काय आढळलं?

समिती निर्णय देणार

या प्रकरणाची डॉ. प्रमेंद्र ठाकुर यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, एमवायएच रुग्णालय हे महात्मा गांधी मेमोरियर मेडिकल कॉलेजशी संबंधित आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉ. संजय दीक्षित यांनी तीन सदस्यीय समिती गठित करुन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुटुंबीयांनाही झाली मारहाण

अपघातग्रस्त रुग्णासोबत आलेल्या एका कुटुंबातील सदस्याने सांगितले की, आम्ही रुग्णाला त्याचा पाय मोडला म्हणून एमवायएच रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले होते. मात्र तो गेल्या काही दिवसांपासून एचआयव्हीबाधित होता. त्याच्या त्या एचआयव्ही संसर्गाबाबत सांगितले नाही म्हणून ज्युनियर डॉक्टरकडून त्याला त्याला मारहाण करण्यात आली. ज्यावेळी मी मध्यस्थी केली त्यावेळी त्या ज्युनियर डॉक्टरांनी मलाही मारहाण केली. त्यामुळे आता रुग्णालयाच्या कुटुंबीयांनी या घटनेची तक्रार सीएम हेल्पलाइनवर करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Surat : ‘मेल्यानंतर कुणाला…’, कुटुंबातील 7 जणांची मृत्युला मिठी, सुसाईड नोटमध्ये काय?

होऊ शकते तुरुंगवासाची शिक्षा

एचआयव्ही कायदा 2017 च्या तरतुदींनुसार, एचआयव्ही असलेल्या रुग्णाशी गैरवर्तन आणि भेदभाव केल्यास 3 महिने ते 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे एचआयव्हीग्रस्त व्यक्तींविरुद्ध कोणताही भेदभाव केल्यास भेदभाव करणाऱ्या व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT