5 वर्षे अफेअर अन् लग्नानंतर शिक्षण देऊन पत्नीला बनवलं उपनिरीक्षक पण, शेवटी तिने...

मुंबई तक

पतीने आपल्या पत्नीला शिक्षण देऊन उपनिरीक्षक बनवलं. मात्र, त्याच पतीवर महिलेने हुंड्याची मागणी आणि छळ केल्याचा आरोप करत FIR दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

पत्नीला उपनिरीक्षक बनवलं; पण, शेवटी पत्नीने...
पत्नीला उपनिरीक्षक बनवलं; पण, शेवटी पत्नीने...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

5 वर्षे अफेअर अन् लग्नानंतर शिक्षण देऊन पत्नीला उपनिरीक्षक बनवलं

point

पण, शेवटी पत्नीने... नेमकं कोण चुकलं?

Crime News: उत्तर प्रदेशातील हापुड येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे पतीने आपल्या पत्नीला शिक्षण देऊन उपनिरीक्षक बनवलं. मात्र, त्याच पतीवर महिलेने हुंड्याची मागणी आणि छळ केल्याचा आरोप करत FIR दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पती गुलशन याने हापुडचे एसपी कुंवर ज्ञानेंद्र सिंह यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी, उपनिरीक्षक पायल रानी हिने तिचा पती गुलशन आणि त्याच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरुद्ध हापुड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. 

सासरच्या लोकांना भरपूर हुंडा दिल्याचा आरोप 

हापुडच्या गणेशपुरा येथील रहिवासी असलेल्या आणि बरेली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला उपनिरीक्षक पायल रानी हिने 13 नोव्हेंबर 2025 रोजी हापुडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पायल रानीने केलेल्या आरोपानुसार तिचे लग्न 2 डिसेंबर 2022 रोजी पिलखुवा पोलीस स्टेशन परिसरातील पूठा हुसेनपूर गावातील रहिवासी असलेल्या गुलशन नावाच्या तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबियांनी भरपूर सासरच्या मंडळींना भरपूर हुंडा दिला होता, परंतु तिच्या सासरच्या लोकांनी समाधानी नव्हते. 

हे ही वाचा: मुंबईची खबर : हायकोर्टाने आदेश देऊनही वांद्रे स्कायवॉक बंद... काम सुद्धा पूर्ण, मग नेमकं कारण काय?

हुंड्यासाठी सासरी शारीरिक आणि मानसिक छळ 

लग्नानंतर, महिलेचा पती गुलशन, तिचे सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी आणखी हुंड्याची मागणी करण्यास सुरूवात केल्याचा पायलने आरोप केला. संबंधित महिलेने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, तिच्या सासरच्या लोक तिच्याकडे 10 लाख रुपये रोख आणि एका कारची मागणी करत होता. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिचा सासरी छळ होण्यास सुरूवात झाली. इतकेच नव्हे तर, सासरच्या मंडळींनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तसेच, तिला निर्दयीपणे मारहाण केली. एवढंच नाही तर, तिच्यावर अॅसिड फेकून तिला जीवे मारण्याची देखील धमकी दिली. याच कारणामुळे, पायलला तिच्या जीवाला धोका जाणवू लागला. 

पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांच्या आदेशानुसार, पोलीस स्टेशनमध्ये पायल रानीच्या तक्रारीवरुन पती गुलशनसह महिलेच्या सासरच्या सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण, धमकी आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp