Sharad Mohol ला संपवून मारणे फिरला 3 राज्यं, अखेर कसा सापडला? वाचा Inside Story
Ganesh Marne Arrest: कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी फरार गणेश मारणे याला अखेर अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या त्याच्या अटकेची इनसाइड स्टोरी
ADVERTISEMENT
Ganesh Marne Arrest in Sharad Mohol Murder Case: निलेश झालटे, पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात असताना हत्या केली. हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर ही हत्या किती व्यवस्थित प्लॅन करुन करण्यात आली होती हे समोर आलं. आता याच प्रकरणातील सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे. (after the murder of sharad mohol ganesh marne went to 3 states know how pune police finally caught him know his inside story)
ADVERTISEMENT
स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात उतरला होता. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात वीसहून अधिक आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणाचा मास्टरमाईंड मुख्य आरोपी गणेश मारणे फरार होता.महिन्याभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. हत्येनंतर तीन राज्यांमध्ये फिरलेल्या गणेशचा अखेर फिल्मी स्टाईल पाठलाग करत पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
हे ही वाचा>> Kalyan : लव्ह, सेक्स आणि गर्भपात…, BJP च्या माजी नगरसेवकावर गुन्हा
गणेश मारणेला पकडण्याचा हा थरार कसा होता, शरद मोहोळच्या हत्येत त्याचा सहभाग कसा होता, हे सविस्तर जाणून घेऊया.
हे वाचलं का?
नेमकं काय घडलं?
गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री मोशी टोल नाक्याजवळ बेड्या ठोकल्या. याप्रकरणात पुणे पोलिसांनी 17 जणांविरोधात मोक्का लावला आहे, तर आतापर्यंत 20 पेक्षा अधिक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 31 जानेवारीच्या रात्री आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. गणेश मारणे याने पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता.
शरद मोहोळच्या हत्येमध्ये विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे प्रमुख सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोहोळ याच्या हत्येआधी मारणे आणि शेलार यांची मीटिंग घेतली होती, अशी माहिती आहे. शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यावेळी मारणेचे नाव घेतले होते. त्यामुळे गणेश मारणेला पोलिस शोधत होते.
ADVERTISEMENT
गणेश मारणे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली होती. पण तो नेहमी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी व्हायचा. गेल्या तीन आठवड्यांपासून पोलीस गणेश मारणेचा पाठलाग करत होते. अखेर गणेश तुळजापूर परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी तुळजापूरमध्ये शोधमोहीम सुरु केली, पण गणेश मारणे याने कर्नाटकात पलायन केले. गुन्हे शाखेचं एक पथक तात्काळ कर्नाटकात गेले पण तोपर्यंत गणेश मारणे याने केरळ गाठलं. गुन्हे शाखेचं पथकाने केरळमध्येही जात त्याचा तपास सुरु केला पण गणेशने तोपर्यंत ओडिशाला पलायन केलं.
तो ओडिशामधून नाशिकमध्ये आला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी बरोबर फिल्डिंग लावली. पोलिसांनी नाशिकमधूनच गणेश मारणेचा पाठलाग सुरु केला. सगळ्या गाड्या चेक केल्या जात होत्या. अखेर मारणे आपल्या साथीदारासह कारमधून जात असल्याचं समजलं. आणि पोलिसांनी मोशी टोल नाक्याजवळ गणेश मारणेला बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा>> ‘पॉर्न पाहण्याची लागलेली सवय..’ अल्पवयीन मुलाला कसं संपवलं?, आरोपी बापानेच सांगितला घटनाक्रम!
गणेश मारणेने पोलिसांना गुंगारा देऊन पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या मूळ आरोपींमध्ये मारणेचं नाव नव्हतं. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांडमध्ये मारणे फरारी म्हणून दर्शवले नाही, त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन द्यावा, अशी मागणी मारणेच्या वकिलाने केली होती. पण मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरड करताना मारणेचे नाव घेतले असा युक्तिवाद सरकारी वकिलाने केला होता. त्यानंतर आता मारणेला पोलिसांनी पाठलाग मुसक्या आवळल्या.
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्येप्रकरणी याआधी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे.
ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळचा त्याच दिवशी गेम ओव्हर झाला होता. शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करत स्व:ताला सेफ करण्याचा कदाचित त्याचा प्रयत्न असावा मात्र जे सुरक्षेला होते, त्यांनीच त्याचा पद्धतशीर गेम केला होता. त्याच्या हत्येच्या संदर्भात वेगवेगळ्या बाबी अजून समोर येत आहेत. दरम्यान हे गँगवार कधी थांबणार हा सध्या तरी प्रश्नच आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT