अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, 2 डबे जळून खाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ahmednagar-Ashti railway caught fire 2 coaches gutted no casualties
Ahmednagar-Ashti railway caught fire 2 coaches gutted no casualties
social share
google news

Railway Accident : अहमदनगर-आष्टी रेल्वेला (Ahmednagar-Ashti Railway) शिरडोहजवळ आग (Fire) लागल्याने रेल्वेचे दोन डबे जळून खाक झाले आहे. अहमदनगर-बीड-परळी मार्गावर (Ahmednagar-Beed-Parli route) धावणाऱ्या अहमदनगर-आष्टी रेल्वेला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. रेल्वे प्रशासनासह, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन रेल्वेत किती जण प्रवास करत होते. त्याची माहिती घेण्यात येते आहे.

ADVERTISEMENT

प्रवाशांची तारांबळ

अहमदनगर-आष्टी रेल्वेच्या दोन डब्यांना अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनासह प्रवाशांचीही तारांबळ उडाली. या रेल्वेत 15-20 प्रवासी होते. हे प्रवासी सुखरुप असून रेल्वेकडून माहिती घेतली जात आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीचे रौद्ररुप

रेल्वेला आग लागल्याचे कळताच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. आधी रेल्वे इंजिनच्या मागील डब्यांना आग लागल्यानंतर दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. दोन डब्यांना आग लागताच जोडून असलेल्या डब्यांना आग लागून चार डब्यांना आग लागून आग भडकली. या आगाती रेल्वेचे प्रचंड नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली त्याचा शोध घेण्यात येत आहे.

हे वाचलं का?

नेमकं कारण काय?

अहमदनगर-आष्टी रेल्वेला आग लागल्यानंतर त्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या आगीत रेल्वेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या रेल्वेला डेमो रेल्वे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांचीही संख्या कमी असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT