4 वर्षाच्या मुलाचा आईनेच चिरला गळा, CEO सूचना सेठने केलेल्या हत्येची Inside Story

मुंबई तक

सूचना सेठ हे नाव सोशल मीडियावर काही नवं नाही. यशाला गवसणी घालणाऱ्या सूचना सेठने मात्र यावेळी अनेकांना धक्का दिला आहे. कारण काय तर घटस्फोट घेतलेला नवरा मुलाला भेटायला येतो म्हणून तिने सरळ मुलाची गळा चिरूनच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

ai ceo suchana Seth killed boy by slitting his throat divorced husband was coming meet him
ai ceo suchana Seth killed boy by slitting his throat divorced husband was coming meet him
social share
google news

Goa Murder : सूचना सेठ हे नाव सोशल मीडियाला काही नवं नाही. कारण तिने अशा यशाला गवसणी घातली आहे की, तिच्या त्या यशामुळे आणि सोशल मीडियामुळे (Social Media) ती साऱ्या जगाला माहिती झाली आहे. मात्र आता हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते काही कोणत्याही यशस्वी गोष्टीमुळे नाही तर एका गंभीर गुन्ह्यामुळं तिचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण सूचना सेठ (Suchana Seth) या 39 वर्षाच्या महिलेनं तिच्या चार वर्षाच्या मुलाची (Son) निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. मात्र तिने ती हत्या का केली त्याची कारणं समोर आली त्यावेळी मात्र अनेकांना त्याचा धक्का बसला आहे.

सूचना सेठ यशस्वी CEO

सूचना सेठ एक यशस्वी सीईओ, एक यशस्वी टेक्नो आणि यशस्वी उद्योजकही. ती बेंगळुरूमधील स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ आहे. मात्र सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे कारण तिच्यावर सध्या तिच्याच चार वर्षाच्या मुलाची तिने हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. त्यानंतर मुलाचा मृतदेह बॅगेत ठेवून तिने पळ काढला होता.  मात्र तरीही तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच घटनेचा हा सारा वृत्तांत…

न्यायालयाच्या निर्णयानं नाराज

सूचना सेठचं लग्न 2010 मध्ये झालं होते, ती मुळची पश्मिम बंगालची, मात्र तिचा नवरा हा केरळचा होता. लग्नानंतर त्या दोघांना एक मुलगा झाला. मात्र 2020 मध्ये त्या पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली, आणि त्यांचे ते प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला, मात्र त्यावेळी न्यायालयाने हाही निर्णय दिला की, वडील त्याच्या मुलाला दर रविवारी त्याला भेटू शकतात. न्यायालयाचा हाच निर्णय तिला पटला नाही. त्या न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे ती प्रचंड नाराज आणि तणावात राहू लागली. तिला अजिबात असं वाटत नव्हतं की, तिच्या नवऱ्याने तिच्या त्या मुलाला भेटावं.

निवडलेला पर्याय भयंकर

न्यायालयाने नवरा बायकोला घटस्फोट दिला तरी बापाच्या मायेनं त्यालाही आपल्या मुलाला भेटावं हे वाटत होतच. मात्र त्यावर सूचना सेठने एक पर्याय शोधला. मात्र तो पर्याय इतका भयनाक असेल असं कोणाच्या ध्यानीमनीसुद्धा आलं नव्हतं. सूचना सेठने ठरवल्याप्रमाणे ती मुलाला घेऊन गोव्याला गेली. त्यावेळी त्या लहान मुलाला तिने सांगितले की, चल तुला गोव्याची सफर घडवून आणतो. त्यामुळे तिचा मुलगाही आनंदाने नाचू लागला. गोव्यात पोहचल्यावर मात्र तिने एक हॉटेल बूक केले आणि ती दोघं तिथं राहिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp