Air hostess murder : चिरलेला गळा,रक्ताने माखलेली फरशी; रुपल ओगरेच्या हत्येची CCTV त कैद झाली स्टोरी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

airhostess rupal ogre murder mystery revealed accused soceity clener mumbai crime story
airhostess rupal ogre murder mystery revealed accused soceity clener mumbai crime story
social share
google news

Mumbai Air Hostess Rupal Ogre Murder: 23 वर्षाची रूपल ओगरे ही तरूणी एअरहोस्टेस बनण्याचं स्वप्न घेऊन छत्तीसगढवरून मुंबईत आली. आणि आपल्या स्वप्नाची उड्डाण भरण्यासाठी तयारी सुरु केली. यासाठी तिने एअर इंडियात एअर होस्टेसचे प्रशिक्षण सुरु देखील केले होते. सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण अचानक रविवारी तिने कुटुंबियांचे फोनच उचलले नाही. त्यामुळे काळजीपोटी कुटुबियांनी तिची विचारपूस करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले आणि ही रूपल ओग्रेची हत्या झाल्याची घटना उजेडात आली. (airhostess rupal ogre murder mystery revealed accused soceity clener mumbai crime story)

मुंबईच्या अंधेरी पुर्वेतील मरोळ भागातील एनजी को ऑपरेटीव्ह सोसायटीत रूपल ओगरे राहत होती. रूपलसोबत तिची एक चुलत बहिण आणि तिचा मित्र राहायचा. मात्र काही दिवसांपूर्वीच तीची बहिण आणि तो मित्र गावी गेला होता. त्यामुळे रूपल ओगरे घरी एकटीच होती. या दरम्यान रविवारी रूपल ओगरे तिचा फोन उचलत नसल्याने कुटुंबियांनी तिची चौकशी करण्यासाठी एका व्यक्तीला घरी पाठवले होते. मात्र रूपल ओग्रे ना फोन उचलत होती, ना दरवाजा उघडत होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीने चावीवाल्याला बोलावून घर उघडले होते.

हे ही वाचा : OBC Reservation : मराठा की ओबीसी? मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय झाला?

घर उघडताच घरात रक्ताचे डाग होते. आणि बाथरूममध्ये रूपल ओग्रेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ माजली होती. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी यावेळी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रूपल ओगरेची हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ टीम बनवल्या होत्या. या आठ टीम वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत होत्या. या तपासा दरम्यान पोलिसांनी सकाळपासून दुपारी 2 पर्यंत सोसायटीत प्रवेश करणाऱ्या 35 जणांची चौकशी केली होती.मात्र या चौकशीत पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला. यासोबत पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले.

सोसायटीतील 35 लोकांची चौकशी करून देखील हाती काहीच न लागल्यानो पोलिसांनी स्वच्छता कर्मचाऱ्याची चौकशी करायला सुरुवात केली होती.या चौकशीत एका सफाई कर्मचाऱ्याच्या शरीरावर जखमेचे निषाण होते. हे निषाण ताजे होते. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. विक्रम अटवाल 40 असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Kalwa Crime: चारित्र्याचा संशय अन् हत्येपूर्वी फोन कॉल, प्रमिला साळवी यांच्या हत्येमागची थरारक कहाणी

दरम्यान या प्रकरणात रूपलने आरोपी विक्रमला घरी बोलावले होते. घरात चॉकअप झालेला पाईप साफ करण्यासाठी तिने विक्रमला बोलावले.यावेळी रूपल घरी एकटीच असल्याचे पाहून विक्रमने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र तिने याला विरोध दर्शवताच त्याने तिचा गळा चिरून हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने सध्या मुंबई हादरली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT