Akola: बाई... हा काय प्रकार? बाजारात आलाय सिमेंटचा लसूण; फेरीवाल्याकडून महिलेची फसवणूक!
Akola News : अकोल्यात सिंमेटपासून तयार केलेले बनावट लसूण विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेरीवाले लोकांना बनावट लसूण विकून निघून जात आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अकोल्यात सिंमेटपासून तयार केलेले बनावट लसूण विक्री
फेरीवाल्यांकडून लसणात सिमेंट मिसळून लोकांची फसवणूक
लसणाची नीट पाहाणी केली असता त्यात सिमेंट भरल्याचे आढळले.
Akola Fraud Case of selling Cement Garlice : अकोल्यात सिंमेटपासून तयार केलेले बनावट लसूण विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीकडेच येथे लसणाचे भाव खूप वाढले आहेत. अशा स्थितीत काही भाजी विक्रेते लसणात सिमेंट मिसळून लोकांची फसवणूक करत आहेत. अकोल्यातील अनेक भागातून अशी प्रकरणे समोर येत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. फेरीवाले लोकांना बनावट लसूण विकून निघून जात आहेत. (akola crime news woman cheated by hawker sold cement garlic to her)
ADVERTISEMENT
असाच काहीसा प्रकार अकोला शहरातील बाजोरिया नगरमध्ये राहणारे पोलीस विभागातून निवृत्त झालेले सुभाष पाटील यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्या पत्नीने घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतला. घरी आल्यावर त्यांनी लसूण सोलायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या. सुरीने कापूनही पाकळ्या सोलता येत नव्हत्या.
हेही वाचा : Crime: बदलापूर हादरलं! चिमुरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी काढला मोर्चा
लसणाची नीट पाहाणी केली असता त्यात सिमेंट भरल्याचे आढळून आले. लसणात सिमेंट भरून त्यावर रंग मारला होता. जे अगदी खऱ्याखुऱ्या लसणासारखे दिसत होते. यानंतर, लसूण चाकूने कापण्यात आला तेव्हा आतून सिमेंटचा गोळा बाहेर निघाला.
हे वाचलं का?
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना IMD चा महत्त्वाचा इशारा!
कसा तयार केला सिमेंटचा लसूण?
आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून हा बनावट लसूण तयार केला जातो. या लसणाच्या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या होत नाहीत. या लसणांवर पांढरा रंग दिला जातो, जेणेकरून तो खऱ्याखुऱ्या लसणाप्रमाणेच दिसेल. या लसणाच्या गाठीचे वजन 100 ग्रॅम इतकं असतं.
हेही वाचा : Shreyas Talpade: "मी जिवंत आहे, माझी मुलगी..."; निधनाच्या अफवा पसरवाणाऱ्यांना श्रेयस तळपदेनं झापलं
काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांकडून अशा फसणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सध्या अनेक शहरांमध्ये लसणांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे काळाबाजार करणारे विक्रेते या गोष्टींचा फायदा घेऊन नागरिकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT