Ambernath Accident : दुचाकी ट्रक खाली अन् चालकाला मृत्यूने मारला कट; अंगावर काटा आणणारा अपघाताचा Video

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

ambernath accident video truck driver hit bike accident ambernath cctv video goes viral on social media
बरनाथमधून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंबरनाथमध्ये भयंकर अपघात

point

दुचाकीस्वार मृत्यूच्या दारातून परतला

point

अंबरनाथमधील अपघाताची घटना सीसीटिव्हीत कैद

Ambernath Accident Video : अंबरनाथमधून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दुचाकीस्वाराला काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. कारण दुचाकीस्वाराला (Two Wheeler) एका ट्रकने (Truck) भीषण धडक दिली. या धडकेनंतर ट्रक खाली दुचाकी गेली आणि तिचा अक्षरश चुराडा झाला.पण सुदैवाने अपघातात चालकाने स्वत:ला मागे खेचल्याने त्याचा जीव वाचवला होता. अंबरनाथच्या न्यू बाय पास रोडवर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. (ambernath accident video truck driver hit bike accident ambernath cctv video goes viral on social media) 

ADVERTISEMENT

अंबरनाथच्या न्यू बाय पास रोडवर सोमवारी वाहनांची प्रचंड गर्दी होती. रोडवर सिग्नल लागल्याने सगळ्याच गाड्या थांबल्या होत्या. सिग्नल उघडताच सर्वच वाहनांनी गाडी पळवण्याची घाई केली. या घाईघाईत यश एंटरप्रायजेसचे दोन रिकामे ट्रक शिवमंदिराकडे वळत असताना एका दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आली. दुचाकी ट्रक खाली जाताना पाहून चालकाने स्वत:ला मागे खेचले. त्यानंतर ट्रकचालकाने दुचाकीला फरफटत नेले.

हे ही वाचा : Oshin Sharma : पूजा खेडकरनंतर ओशिन शर्मा वादात, सरकारकडून उचलबांगडी; नेमकं प्रकरण काय?

विशेष म्हणजे या अपघातातून दुचाकीस्वार भयंकर वाचला. अशा अपघातांमध्ये वाचण्याची शक्यता फारच कमी असते. पण सुदैवाने दुचाकीस्वार वाचला आणि त्याला किरकोळ दुखापत झाली. ट्रक चालकाला या अपघाताची कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्याने दुरपर्यंत दुचाकीला फरफटत नेले होते. त्यामुळे दुचाकीचा अक्षरश चुराडा झाला होता. या अपघाताचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.तसेच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सूरू केला आहे. 

हे वाचलं का?

दहिसरमध्ये हिट अँड रन

मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील हिट अँड रन प्रकरण समोर आलं आहे. वेगवान कारने दोन दुचाकींना धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कारचालक फरार झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन लोक जखमी झाले आहेत. आदित्य वेलणकर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर करण राजपूत आणि पीयुष शुक्ला अशी जखमींची नावं आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

याप्रकरणी दहिसर पोलिसांनी कलम 106(1),125(A),125(B),281 आणि मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल  केला आहे. पोलीस फरार कार चालकाचा शोध लावण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.  आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी एक अभियान सुरु केलं आहे. परंतु, अजूनही कार चालकाचा पत्ता लागला नाही. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT