लोखंडी सळ्या, जळणारा दिवा अन् 10 वर्षांचा मुलगा; अमरावतीत ‘अघोरी’ कट… पुढे काय घडलं?
जमिनीतील गुप्त धन काढणाऱ्या काही जणांना अमरावती पोलिसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. जमिनीत असलेलं गुप्त धन काढण्यासाठी काही लोक तांत्रिक कामे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
ADVERTISEMENT
Amravati Crime News : जमिनीतील गुप्त धन काढणाऱ्या काही जणांना अमरावती पोलिसांनी (Amravati Police) अटक केली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. जमिनीत असलेलं गुप्त धन काढण्यासाठी काही लोक तांत्रिक कामे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यांच्यासोबत एक 10-12 वर्षांचा मुलगाही होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाच तरुण आणि एका महिलेला अटक केली आहे. (Amravati Crime News Police Arrest 6 Accused Who’s Doing Aghori customs and witchcraft)
ADVERTISEMENT
हे प्रकरण अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली जहांगीर गावचं आहे. बुधवारी (11 ऑक्टोबर) रात्री काही लोक गावात राहणाऱ्या महिलेच्या घरी पोहोचले होते. त्याच्यासोबत एक 10-12 वर्षाचा मुलगाही होता. महिलेच्या घरी पोहोचलेले लोक जमिनीत पुरलेलं गुप्त धन काढण्यासाठी तांत्रिक विधी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले. महिलेच्या घरी पोहोचल्यावर घरात कोणीच नसल्याचे त्यांनी पाहिले.
नवी मुंबई: 19 वर्षाच्या तरुणीवर डझनभर वार, मृतदेह पाहून पोलीसही हादरले!
महिलेसह 6 जणांना अटक
जमिन खोदण्यासाठी सेबल्स (लोखंडी सळ्या) ठेवल्या होत्या. घरातील बाथरुममध्ये तंत्र मंत्र करत असल्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. झडती घेतली असता घरात लपून बसलेल्या सुखदेव महाराज पाटोरकर याला ताब्यात घेण्यात आले. त्यांनीच हा तंत्र-मंत्र केला असल्याचे समोर आले. सुखदेवने माहिती दिल्यानंतर त्याचे साथीदार आणि घराजवळ लपून बसलेल्या एका महिलेलाही ताब्यात घेतले.
हे वाचलं का?
त्यांच्यासोबत एक मुलगा असल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते, मात्र पोलिसांना ते मूल कुठेच दिसले नाही. यानंतर पोलिसांनी सर्वांना पकडून आपल्यासोबत नेले.
NCP: ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’, सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ
याप्रकरणी पुढील कारवाई सुरू!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मानवी बळी व इतर अमानुष आरोप, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या लोकांच्या चौकशीदरम्यान मुलाची माहिती मिळाली. मुलाच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT