Atiq Shooter Interrogation : ‘मी कट्टर हिंदूवादी आणि परशुरामाचा वंशज’, चौकशीत आरोपी लवलेशचा खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

atique ahmed ashraf ahmed murder three accused sunny lavelesh arun police inquiry
atique ahmed ashraf ahmed murder three accused sunny lavelesh arun police inquiry
social share
google news

Atique-Ashraf Ahmed Murder Three Accused Police Inquiry : उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmad)यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या लवलेश तिवारी,सनी सिंह आणि अरूण या तीनही आरोपींची बुधवारी पोलिसांनी कसून चौकशी केली होती. या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपींनी त्यांचा संपूर्ण क्रिमिनल रेकॉर्ड सांगितला आहे. (atique ahmed ashraf ahmed murder three accused sunny lavelesh arun police inquiry)

ADVERTISEMENT

पोलिसांनी बुधवारी लवलेश तिवारी,सनी सिंह आणि अरूण या तीनही आरोपींची चौकशी केली. यावेळी तिन्ही आरोपींकडून सत्य माहिती काढून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची सुरूवातीला 8 तास मानसोपचार तज्ज्ञांप्रमाणे चौकशी केली. या चौकशीत पोलिसांनी आरोपींच्या आयुष्याबद्दल, कुटूंबियांबद्दल आणि सवयींबद्दल माहिती काढून घेतली. यावेळी लवलेशने स्वत:ला कट्टर हिंदुवादी सांगितले, तर शुटर सनी सिंहने स्वत:ला डॉन म्हटलेय, यासह अनेक धक्कादायक खुलासे केलेत.

पोलीस चौकशीत लवलेश तिवारीने स्वत:ला कट्टर हिंदुवादी आणि परशुरामाचा वंशज म्हटले आहे. लवलेश सोशल मीडियावर स्वत:ला प्रसिद्ध करण्याच्या प्रयत्नात देखील होता. तीनही आरोपींपैकी सनी सिंह अधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि महत्वाकांक्षी असल्याचे दिसून आले. तसेच तीनही आरोपी पहिल्या रात्री आपआपल्या सिद्धांतावर ठाम राहिले. लवलेश, सनी आणि अरूण, माफिया अतिक अहमदला मारून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा मुद्दा सतत चौकशीत मांडताना दिसले. मला कोणी गुरु नाही आहे, मी स्वत: एक डॉन आहे असल्याचे शूटर सनी सिंहने चौकशीत सांगितले.

हे वाचलं का?

जिगाना पिस्तुलबद्दल आरोपी काय म्हणाला?

अरूणला जिगाना पिस्तुल कुठून मिळाल्याचा प्रश्न पोलिसांनी विचारला होता. यावेळी अरूणने पानिपतमधील मित्राने पिस्तुल दिल्याची कबूली दिली. मला माहित नाही ही इतक्या किंमतीची पिस्तुल आहे.मी फक्त त्याला एक चांगले शस्त्र मानत होतो,ज्यामधून कोणीही वाचणार नाही,असे त्यांनी सांगितले. तसेच सनी सिंहने चौकशी दरम्यान सुंदर भाटी यांच्याशी भेट झाल्याचेही मान्य केले आहे. हमीरपूर कारागृहात असताना तो सुंदर भाटीच्या संपर्कात आला होता.मात्र कारागृह बदलल्यानंतर पुन्हा कधीही संपर्क झाला नाही.

कोण आहेत ‘हे’ शुटर?

अतिक हत्याकांडात (Atiq Ahmad) सहभागी असलेला सनी हा हमीरपूरचा आहे. अरूण उर्फ कालिया कासगंजचा आहे, तर लवलेश तिवारी हा बांदा जिल्ह्याचा रहिवाशी आहे. लवलेश विरोधात पोलीस ठाण्यात 4 केस दाखल आहेत. तर मुलीला कानाखाली मारल्याप्रकरणी तो जेलमध्येही जाऊन आलाय. तर सनी हा कुरार पोलिस ठाण्यात हिस्ट्रीशीटर आहे. त्याचा हिस्ट्रीशीट नंबर 281A आहे. त्याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत. अरूणने जीआरपीच्या ठाण्यात तैनात असलेल्या पोलिसाची हत्या केली होती.या हत्येनंतर तो फरार झाला होता.

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

माफिया अतिक अहमद (Atiq Ahmad)आणि अश्रफला पोलीस रात्रीच्या सुमारास मेडिकला घेऊन जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पत्रकार बनून आलेल्या अरूण मोर्या, सनी आणि लवलेश तिवारी या तिघांनी गोळ्या झाडून दोघांची हत्या केली. या घटनेत आरोपींनी 18 राऊंड फायरिंग केली होती, यामधील 8 गोळ्या अतिकला लागल्या होत्या. अतिक-अश्रफचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी अरूण मोर्या, सनी आणि लवलेश तिवारी यांनी सरेंडर केले होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT