Badlapur News: बदलापूरकरांनी रेल्वे रोखली नंतर 'ती' शाळाच फोडली, नेमकं प्रकरण काय?
Badlapur Thane School case : बदलापूरमधील या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर नागरीक चांगेलच संतप्त झाले आहेत. संतप्त नागरीक मोठ्या संख्येने शाळेत दाखल झाले आहेत.शाळेच्या आरावात उभे राहून ते शाळेचा निषेध करत आहेत. तर काही आंदोलक हे वर्गात देखील शिरले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन चिमुरडींवरील अत्याचाराने बदलापूरकर संतापले

संतप्त नागरीक मोठ्या संख्येने शाळेत दाखल झाले

शाळेतील साहित्यांची केली तोडफोड
Badlapur Thane School case Update: बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर बदलापूरकर (Badlapur crime) चांगलेच संतापले आहेत. रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करत आहेत. रेल्वे स्थानकात (Badlapur Railway Station) देखील या आदोलकांनी रेलरोको केला होता. यानंतर आता त्या शाळेची तोडफोड (School Vandlised) करण्यात आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. (badlapur crime news 2 nursery kide sexually assaulted school parents block rail blockade and vandalism of school materials)
बदलापूरमधील या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर नागरीक चांगेलच संतप्त झाले आहेत. संतप्त नागरीक मोठ्या संख्येने शाळेत दाखल झाले आहेत.शाळेच्या आरावात उभे राहून ते शाळेचा निषेध करत आहेत. तर काही आंदोलक हे वर्गात देखील शिरले आहेत. वर्गातील वस्तुंची आणि खिडक्यांची तोडफोड करत आहे. या घटनेवरून नागरीकांचा उद्रेक दिसून येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बदलापुरमधील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं. 12-13 ऑगस्ट रोजीची सकाळच्या वेळचे वर्ग सुरु असतानाची ही घटना आहे. शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रायवेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला प्रकार सांगितला.
हे ही वाचा : Crime: बदलापूर हादरलं! चिमुरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी काढला मोर्चा
यावेळी मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याच समजलं. स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच समजलं.