Crime : मैत्रिणीनेच केला घात! गुंगीचे औषध देऊन मित्रांकडून बलात्कार, बदलापूर पुन्हा हादरलं
Badlapur Rape Case : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता एका 22 वर्षीय तरूणीवर (Rape Case) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तरूणींच्या मित्रांनीच (Friends) तिच्यावर बलात्कार केला आहे आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणात पिडित तरूणीच्या मैत्रिणीचाच हात होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बलात्काराच्या घटनेने बदलापूर पुन्हा एकदा हादरलं
22 वर्षीय तरूणीवर मित्रांनीच केला बलात्कार
बलात्कार प्रकरणात मित्रांसोबत मैत्रिणीचाही होता हात
Badlapur Rape Case : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता एका 22 वर्षीय तरूणीवर (Rape Case) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तरूणींच्या मित्रांनीच (Friends) तिच्यावर बलात्कार केला आहे आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणात पिडित तरूणीच्या मैत्रिणीचाच हात होता. या प्रकरणी आता पोलिसांनी (Badlapur Police) संतोष रूपवते (40), शिवम राजे (22) आणि एका तरूणीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेने बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. (baldapur crime news 22 year girl raped by two friend with the help of one girl shocking story from badlapur crime story)
बदलापूरच्या शिरगाव भागात ही घटना घडली आहे. 22 वर्षीय पिडीत तरूणीची बदलापूर पुर्वेत राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरूणीशी काहीच दिवसांपूर्वी मैत्री झाली होती. या दरम्यान भूमिकाचा वाढदिवस असल्या कारणाने तिने पि़डीत तरूणीला वाढदिवसाला बोलावले होते. नवीन नवीन मैत्री होती, ही मैत्री आणखीण घट्ट व्हावी यासाठी पिडीत तरूणीच्या वाढदिवसाला पोहोचली होती. या वाढदिवसाला भूमिकाचे दोन मित्र देखील आले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर भूमिकाने तिच्या पेयात गुंगीचे औषध टाकल्याचा आरोप आहे. त्यामुळे तरूणी बेशुद्ध झाली होती. याचाच फायदा घेऊन संतोष रुपवते आणि शिवम राजे या दोन्ही मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.
हे ही वाचा : Maharashtra Assembly Election Survey : ठाकरेंना बसणार जबर झटका, विधानसभेत शिंदेंचं काय होणार? खळबळजनक सर्व्हे
दुसऱ्या दिवशी तरूणी घरी न परतल्याने पालकांनी भूमिका या तरूणीला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकांनी तरूणीना घरी आणले. शुद्ध आल्यानंतर तरूणीला आपल्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर आई वडीलांनी तत्काळ आपल्या मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी शिवम राजे (22) आणि सातारा येथून आलेल्या संतोष रूपवते (40), आणि तरूणी भूमिका मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचसोबत तीनही आरोपींना अटक देखील केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4 ते 5 तारखे दरम्यान ही घटना घडली आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीला ही पिडीत तरूणी गेली होती. यावेळी बर्थडे पार्टीत तिच्यासोबत ही घटना घटली. पार्टीत आधी केक कापल्यानंतर दारू प्यायले त्यानंतर मुलीवर बलात्कार केला गेला. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे, अशी माहिती बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यत किती महिलांना मिळाले?
ADVERTISEMENT