Balu More : शिवसेनेनंतर भाजप नेत्याला गोळ्या घालून संपवलं, जळगाव हादरलं!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातही भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या सर्व  घटनेने आता महाराष्ट्र हादरला आहे.
balu more bjp ex corporator dies during treatment mahendra more chalisagaon firing case jalgaon news mahendra gaikwad abhishek ghosalakar
social share
google news

Balu More Dies In Chalisagaon Firing : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या सर्व घटना ताज्या असतानाच आता तिकडे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या सर्व  घटनेने आता महाराष्ट्र हादरला आहे.  (balu more bjp ex corporator dies during treatment mahendra more chalisagaon firing case jalgaon news mahendra gaikwad abhishek ghosalakar) 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यात  तीनच दिवसांपूर्वी जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू  मोरे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेतनंतर बाळू मोरे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटेच त्यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत माळवली. या घटनेने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. 

हे ही वाचा : भाजप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर निखिल वागळे संतापले, पाहा नेमकं काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय? 

बाळू मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. गेल्या 7 फेब्रुवारीला ते आपल्या कार्यालयात बसले होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही अज्ञात हल्लेखोरांनी येऊन त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. तब्बल 8 गोळ्या मोरेंवर झाडण्यात आल्या होत्या.  यामधील एक गोळी त्याच्या छातीला, पोटाला आणि पायाला लागली होती. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले होते. 

ADVERTISEMENT

दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर नागरिकांनी त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल केले होते.  यावेळेस नाशिकच्या अशोका हास्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सूरू होते. या उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'निर्ढावलेला, निर्घृण.. निर्दयी आणि लांडग्यासारखा गृहमंत्री', ठाकरेंना संताप अनावर; फडणवीसांवर तुटून पडले

या प्रकरणी पोलिसांनी आता 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार चाळीसगाव पोलीस ठाण्यात पाच हल्लेखोर आणि कट रचणारे 2 अशा 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुर्ववैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT