Crime : कॉलेजमध्ये पडला रक्ताचा सडा, अल्पवयीन मुलाकडून विद्यार्थ्याची हत्या; बारामतीत का घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 baramati crime news minor boy killed 12 th student in college shocking crime story
जून्या वादातून आरोपींनी तरूणाची हत्या केल्याची माहिती आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जून्या वादातून अल्पवयीन मुलाची हत्या

point

अल्पवयीन मुलाने 12 वीत शिकणाऱ्या मुलाला संपवलं

point

हत्येच्या घटनेने बारामती हादरलं

Baramati Crime News : वसंत मोरे :  बारामतीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांची चाकूने गळयावर वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. अर्थव पोल असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. टी. सी कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. जून्या वादातून आरोपींनी तरूणाची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेत पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे, तर दुसरा तरूण हा फरार आहे. या घटनेनंतर टी.सी कॉलेजमध्ये खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.  (baramati crime news minor boy killed 12 th student in college shocking crime story) 

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अथर्व पोल आणि आरोपाी हे दोघेही टी सी कॉलेजमध्ये 12 वीचे शिक्षण घेत होते. दोन्ही ही अल्पवयीन मुलं होती. 15 दिवसांपूर्वीच कॉलेजमध्ये येत असताना दोघांमध्ये बाईकला कट मारल्यामुळे वाद झाला होता. या वादानंतर दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचाच राग मनात धरून आरोपी अल्पवयीन मुलाने अथर्वच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी आरोपी बॅगेतूनच चाकू लपवून घेऊन आला होता.

हे ही वाचा : Cabinet Meeting : गायींना मिळणार महिन्याला दीड हजार, शिंदे सरकारची नवीन योजना नेमकी काय?

या दरम्यान कॉलेजच्या मुख्यपरिसरात आरोपी आणि अथर्वची समोरासमोर भेट झाली होती. तेव्हाच आरोपीने बँगेतून चाकू काढून अथर्वच्या मानेवर वार केले होते. यामुळे अथर्व हा गंभीररित्या जखमी झाला होता.विशेष म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली, त्यावेळेस मुख्यपरिसरात अनेक विद्यार्थी हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्यासमोरही ही घटना घडली होत. त्यानंतर कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर अथर्व गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.या घटनेने पोल कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हे वाचलं का?

या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास करायला सुरूवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. याप्रकरणात दोन्हीही आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दोघांनी नाव उघड केली नाही आहेत. तसेच या प्रकरणात आता पोलीस अधिकचा तपास करत आहे. या घटनेने बारामती हादरलं आहे. 

हे ही वाचा : Rajyamata-Gomata: शिंदे सरकारने दिला गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा, पाहा GR जसाच्या तसा...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT