पती अन् चिमुकल्याचा मृतदेह आढळला, पत्नी चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

मुंबई तक

Bengaluru Crime : बंगळुरूमध्ये 38 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या पाच वर्षांच्या मुलाचा घरात मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

Bengaluru Crime
Bengaluru Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पती अन् चिमुकल्याचा मृतदेह आढळला

point

पत्नी चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

Bengaluru Crime : बंगळुरूमध्ये सोमवारी 38 वर्षीय अभिनंदन आणि त्याचा पाच वर्षांचा मुलगा त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभिनंदनची पत्नी हरीनी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कुटुंबीय रविवारी नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर ते घरी परतले. घरी आल्यानंतर अभिनंदन आणि हरीनी यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वादानंतर दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : दोन बॉयफ्रेंड, तरुणी झाली प्रेग्नंट, बाळाचा बाप कोण? DNA चाचणीतून होणार खुलासा

वडील आणि मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? 

यानंतर हरीनीने पोलिसांना फोन करून तिचा पती आणि मुलगा मृतावस्थेत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अभिनंदन आणि त्याच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह घरात आढळून आला. दोघेही झोपलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनंदनच्या शरीरावर जखमांचे व्रण आढळले आहेत. मात्र, त्याच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. वडील आणि मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची परिस्थिती तातडीने स्पष्ट झालेली नाही.

हेही वाचा : सिंहगडावर राडा, धक्का लागला म्हणून हाणामारी.. हादरवून टाकणारा VIDEO