पार्टीला बोलवून दगडानं डोकं ठेचलं, भिवंडीत मित्राची केली क्रूर हत्या

मुंबई तक

मित्राला दारूची पार्टी देतो असं सांगून त्याला घरातून बोलवून घेऊन गेले, योगेश शर्मा ज्यादिवशी घरातून बाहेर गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर घरातील मंडळीनी त्याची वाट बघून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर योगेश शर्माचाी हत्या झाल्याचे स्पष्ट झाले मात्र ती हत्या का झाली त्याचा शोध घेतल्यावर धक्कादायक कारणच पुढं आले.

ADVERTISEMENT

Bhiwandi friend killed throwing stone head due previous enmity three friends were killed
Bhiwandi friend killed throwing stone head due previous enmity three friends were killed
social share
google news

Murder Case : भिवंडीतील नारपोली पोलिसात 16 वर्षाचा योगेश शर्मा बेपत्ता (Missing Case) असल्याची नोंद 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरू केल्यानंतर योगेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, योगेश 25 तारखेला मित्रांसोबत एका पार्टीला गेला होता. त्यावेळी योगेशच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, त्याचा काही मित्रांसोबत वाद झाला होता. योगेशच्या घरातील लोकांनी त्याच्या अपहरणाची (Kidnapping) भीतीही व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याच्या दोन मित्रांची नावे समोर आली. त्यातील एक होता आयुष झा आणि दुसरा होता मनोज टोपे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही संशयितांना भिवंडीतून ताब्यात घेतले.

बहाणा पार्टीचा अन् कट हत्येचा

पोलिसांनी दोघांची कसोशीने चौकशी केल्यानंतर मात्र धक्कादायक माहिती समोर आली. योगेशचा खून झाल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. या दोन तरुणांनी आपल्या 3 मित्रांसह योगेशची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचेही त्यांनी सांगितले. योगेशच्या 5 मित्रांनी 25 नोव्हेंबर रोजी पार्टीच्या करण्याच्या उद्देश्याने घरातून त्याला बोलवून घेऊन गेले होते. त्यानंतर ठाण्यातील रेतीबंदर परिसरात बिअर पार्टीही त्यांनी केली. त्यावेळी योगेशच्या मित्रांनी म्हणजेच आयुष झा आणि टोपे यांनी त्याला दारू पाजली. त्यानंतर आयुष, टोपे, आणखी तिघांनी त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गेले.

सगळे पुरावे नष्ट

योगेशला निर्जनस्थळी घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्या हल्ल्यातच योगेशचा जागीच मृत्यू झाला. योगेशचा मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी आयुष झा आणि टोपे यांनी खड्डा काढून त्याला तिथेच पुरण्यात आले.

हे ही वाचा >> Heart Attack : हृदयविकाराचा झटका का येतो? नेमकी त्याची लक्षणं काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

मृतदेह खड्ड्यात टाकला

योगेशचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या मित्रानी त्याचे डोके अनेक वेळा दगडाने ठेचले होते, त्यानंतर त्याच्या पायाची नसही कापण्यात आली होती. त्यामुळे तो वाचण्याची कोणतीच शक्यता नव्हती. त्यानंतर त्यांनी योगेशचा मृतदेह खड्ड्यात टाकला आणि त्यावर त्यांनी मीठही टाकले.

हे वाचलं का?

    follow whatsapp