खाकी वर्दीला बट्टा! वाढदिवसाला बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन कॉन्स्टेबल अटकेत

मुंबई तक

भोपाळच्या जहांगीराबाद परिसरात विशेष कृती दलाच्या (SAF) बटालियनमधील कॉन्स्टेबलने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बीएनएसच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

खाकी वर्दीला बट्टा!

point

वाढदिवसाला बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

point

दोन कॉन्स्टेबल अटकेत

Crime News : खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष सशस्त्र बलात (SAF) कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसाचे निमंत्रण देऊन शासकीय निवासस्थानी बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एका साथीदार पोलिसालाही तात्काळ ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ही घटना घडली.

वाढदिवसाचा बहाणा अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी आधीपासूनच या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या संपर्कात होता. त्याने मुलीच्या वाढदिवसाचा बहाणा करून तिला आपल्या घरी बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून विद्यार्थिनी तिथे पोहोचली; मात्र तिथे पोहोचताच आरोपीने तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. या संपूर्ण प्रकारात आरोपीचा दुसरा आरक्षक-मित्र आपल्या चार वर्षांच्या मुलासह घराबाहेर पहारा देत उभा होता, जेणेकरून आत चाललेल्या प्रकाराची कोणालाही कुणकूण लागू नये.

हे ही वाचा : 'सत्ताधारी खासदारांची मुलं सांगताहेत तुमचं चुकतंय' विशाल पाटलांनी सांगितल्या आतल्या गोष्टी!

आणि कुटुंबिय हादरले

या घटनेतून कशीबशी सुटका करून घेऊन पीडित मुलगी आपल्या घरी पोहोचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. संतप्त कुटुंबीयांनी तत्काळ तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवला आहे, तसेच फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

हे ही वाचा : तुम्ही 3 मिनिटं VIDEO पाहिला, पण मोदीजी कोणतीही गोष्ट सहज नाहीत करत! 'हा' फॉर्म्युला पार चक्रावून टाकेल

दोघांना अटक

अतिरिक्त पोलीस उपआयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या या अत्याचाराच्या प्रकरणात SAF बटालियनमधील दोन पोलीस कर्मचारी दोषी आढळले आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी निष्पक्ष आणि सखोल तपास सुरू असून, तपासात निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.