महिलेने क्रूरतेची सीमा गाठली, तिसऱ्या पतीला जिवंत जाळलं, असं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 56 वर्षीय व्यक्तीला त्याच्या तिसऱ्या पत्नीने आणि तिच्या माहेरच्यांनी जिवंत जाळल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. मृताच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेने क्रूरतेची सीमा गाठली

point

तिसऱ्या पतीला जिवंत जाळलं, असं काय घडलं?

UP Crime News : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील सदर कोतवाली हद्दीतील कल्याणी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 56 वर्षीय हृदेश तिवारी यांचा जळालेल्या अवस्थेत मृत्यू झाला असून, त्यांच्या तिसऱ्या पत्नी रानू आणि तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीररीत्या भाजलेल्या हृदेश तिवारी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर : बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनला FDA चा दणका! 50 हजारांचा दंड, कारण काय?

लग्नानंतर करत होती ब्लॅकमेल

या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मृत हृदेश तिवारी यांची मुलगी सोनम हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून समोर आली आहे. सोनमच्या म्हणण्यानुसार, तिच्या सख्ख्या आईचे 2023 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये हृदेश तिवारी यांनी रानू नावाच्या महिलेशी कोर्ट मॅरेज केले होते. रानूचेही हे तिसरे लग्न होते. यापूर्वी तिच्या एका पतीचा मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या पतीने तिला सोडून दिले होते. लग्नानंतर रानू सतत हृदेश तिवारी यांना ब्लॅकमेल करत होती आणि पैसे तसेच मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होती, असा आरोप सोनमने आपल्या तक्रारीत केला आहे. या दबावामुळे हृदेश तिवारी यांनी अर्धा बिस्वा प्लॉट तिच्या नावावर करण्यास तयारी दर्शवली होती.

हेही वाचा : 'डोळा वाचेल की नाही... शरीरावर भयंकर वळ अन् पॅलेट गनचा मारा...', 'त्या' पोराला राहुल गांधींनी आणलं समोर!