तुम्ही 3 मिनिटं VIDEO पाहिला, पण मोदीजी कोणतीही गोष्ट सहज नाहीत करत! 'हा' फॉर्म्युला पार चक्रावून टाकेल

रोहित गोळे

NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 11:52 वाजताचा सेल्फी व्हिडिओ शेअर केला. पण त्यांची ही नवी राजकीय संवादशैली नेमकी का? याचं सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये.

ADVERTISEMENT

gen z frames and midnight selfie videos prime minister modi never does anything casually cjp protest and neet paper leak
PM मोदींची Gen Z फ्रेम अन् मध्यरात्री सेल्फी Video
Google CTA

ज़माना बदल गया है साहब...
अब तख़्त नहीं, स्क्रीन से फैसले होते हैं।
जो दिल तक पहुँचना चाहता है,
उसे पहले मोबाइल की फ्रेम में उतरना पड़ता है।

आणि कदाचित म्हणूनच... काल रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेल्फी व्हिडिओच्या मोडमध्ये आले. PM मोदींचा हहा फक्त व्हिडिओ नव्हता तर ते होतं Gen Z च्या भाषेत, Gen Z पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक सेल्फी मोडमध्ये मोबाईल काढतात आणि थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. ना मोठं स्टेज, ना लाल किल्ला, ना टेलिप्रॉम्प्टर.. फक्त मोबाइल, सेल्फी कॅमेरा आणि तीन मिनिटांचा व्हिडिओ.

प्रश्न असा आहे की पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ फक्त पेपर लीकवरचा संदेश होता का? तर तसं अजिबात नाही. ती होती Gen Z पर्यंत पोहोचण्यासाठीची एक नवी राजकीय रणनीती.