Inside Story: 'इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह आहात का?', मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना अचानक विचारलं अन्...

मुंबई तक

PM Modi Instagram Strategy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्रामच्या वाढत्या प्रभावावर भर देत सर्व मंत्र्यांना या प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ADVERTISEMENT

are you active on instagram why did pm modi suddenly ask this during cabinet meeting
PM Modi Instagram
Google CTA

नवी दिल्ली: देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता सरकारला जाणवू लागली आहे. त्यामुळे देशातील तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना इंस्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय राहण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित मंत्र्यांना थेट प्रश्न विचारला की, "तुमच्यापैकी किती जण प्रत्यक्षात इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत?"

यानंतर त्यांनी या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सक्रिय असल्याचे सांगत, सरकार आणि जनतेमधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली.

'फक्त पोस्ट करून थांबू नका, संवादही साधा'

पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना केवळ सरकारी योजना, निर्णय किंवा कार्यक्रमांची माहिती पोस्ट करण्यापुरते मर्यादित न राहण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी तरुणांशी सातत्याने संवाद साधणारा, प्रश्नोत्तरांना वाव देणारा आणि लोकांचा सहभाग वाढवणारा कंटेंट तयार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.