Personal Finance: महिन्याला अगदी पैशात सुरू होणाऱ्या ‘या’ 7 गुंतवणुका

रोहित गोळे

Investment Tips: महिन्याला केवळ ₹100 पासून गुंतवणूक सुरू करून भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो. SIP, Recurring Deposit, Digital Gold, NPS, PPF आणि इतर कमी रकमेतील गुंतवणुकीचे पर्याय याविषयी सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Personal Finance investment
Personal Finance
Google CTA

Personal Finance Tips: गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते, असा समज अनेकांच्या मनात असतो. मात्र, आजच्या डिजिटल युगात अगदी महिन्याला ₹100 पासूनही गुंतवणुकीची सुरुवात करता येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गुंतवणुकीत रक्कम किती आहे यापेक्षा गुंतवणूक किती लवकर आणि किती सातत्याने सुरू केली, यावर भविष्यातील संपत्ती अवलंबून असते.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन कालावधीत छोट्या रकमेचंही मोठ्या फंडात रूपांतर होऊ शकतं.

1. SIP (Systematic Investment Plan)

म्युच्युअल फंडातील SIP हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. अनेक AMC मध्ये ₹100 पासून SIP सुरू करता येते.