42 वर्षीय पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहायची 18 वर्षीय तरुणी, शेवटी भयानक घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे 18 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात हत्या करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकल्याचा आरोप समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
42 वर्षीय पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहायची 18 वर्षीय तरुणी
शेवटी भयानक घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात 18 वर्षीय पुष्पा देवी हिच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तिच्यासोबत जवळपास एक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय गंगासागर याच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बेपत्ता झाल्याची कहाणी तयार केली होती. मात्र, सुमारे महिनाभरानंतर तरुणीची ओळख पटल्याने आणि तपासाला गती मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण थरियांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरेई गावातील असून मृत तरुणीची ओळख पुष्पा देवी अशी झाली आहे. गंगासागरच्या पत्नीचे यापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्याचा पुष्पासोबत संपर्क आला आणि दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा : DNA रिपोर्टने उलगडा, सख्खा भाऊ निघाला बाळाचा बाप, निर्दोष तरुणावरील गुन्हा कोर्टाने केला रद्द
दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहितीही समोर
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगासागर आणि पुष्पा यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहितीही समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ते राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाड्याच्या खोलीत राहत होते. पुष्पाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती जवळपास वर्षभर गंगासागरसोबत राहत होती. मात्र, काही काळापासून तिचा कुटुंबाशी कोणताही संपर्क होत नव्हता. मुलीशी संपर्क तुटल्यानंतर तिचे वडील महावीर लोधी यांनी अनर्थाची शक्यता व्यक्त केली. त्यांनी राधानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत मुलगी गंगासागरसोबत राहत होती, मात्र आता तिच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले. तसेच गंगासागरने तिची हत्या करून मृतदेह लपवला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून ठाकरे बंधू आक्रमक; 26 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा!
