"शिक्षणासाठी खर्च केला, पण पोलीस होताच पत्नी सोडून गेली..", मग नवऱ्याने काय केलं?
Crime News Bihar : पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर पत्नी आपल्यापासून दुरावल्याचा बिहारमधील एका व्यक्तीचा आरोप आहे. लग्न वाचवण्यासाठी त्याने कटिहार पोलिसांकडे धाव घेतली असून, समुपदेशनातून तोडगा काढण्याची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"शिक्षणासाठी खर्च केला, पण पोलीस होताच पत्नी सोडून गेली.."
मग नवऱ्याने काय केलं?
Crime News Bihar : बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पत्नी पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर आपल्यापासून दुरावल्याचा आरोप करत ती पुन्हा नांदण्यासाठी यावी, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. हंसलाल गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून, त्याची पत्नी प्रतिभा विश्वकर्मा सध्या कटिहारमधील एका पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. पत्नीने आपल्यासोबत राहण्यास नकार दिल्याचा हंसलालचा आरोप आहे. त्याने कटिहारचे पोलीस अधीक्षक परिचय कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी हा वैवाहिक वाद असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग सुचवला आहे. हंसलालला पत्नीसमवेत पुन्हा संसार सुरू करायचा असून, त्यासाठी तो पोलिसांकडून मदतीची अपेक्षा करत आहे.
हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
लग्नानंतर प्रतिभा हंसलालच्या कुटुंबासोबत राहू लागली
हंसलालच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याची प्रतिभाशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यानंतर 2024 मध्ये बिहारमधील कैमूर येथे न्यायालयात त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यात आली. लग्नानंतर प्रतिभा हंसलालच्या कुटुंबासोबत राहू लागली. हंसलालच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला स्वीकारले होते, असा त्याचा दावा आहे. प्रतिभाने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण आणि आपल्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी तसेच बिहार पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे 8 ते 9 लाख रुपये खर्च केल्याचे हंसलालने सांगितले. त्याचे वडील ई-रिक्षा चालवतात. प्रतिभाने बिहार पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तिची कटिहार येथे नियुक्ती झाली.
हेही वाचा : वडिलांचा व्यवसाय बुडाला अन्… सुपरस्टार नाना पाटेकरांचा थक्क करणारा प्रवास, संघर्ष आणि यश!
