आधी दोन चिमुकलींवर बलात्कार केला, मग दगडाने डोकी ठेचली; आरोपीचं सैतानी कृत्य
बिहारमधील पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून एकीची हत्या करण्यात आली आहे तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Bihar Crime: बिहारमधील पाटणामध्ये दोन मुलींवर बलात्कार करून एका मुलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला माध्यमांसमोर आणत या घटनेची माहिती देण्यात आली. बलात्कार (Rape Case) प्रकरणातील आरोपीने हत्या केल्याचे सांगत त्याने त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला. यावेळी त्याने मुलींच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचेही त्याने सांगितले. या प्रकरणात दोघीही मुलींच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता, त्यावेळी दोघींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी बेशुद्ध झाल्याने ती ठार झाल्याचे समजून त्याने तिथून पळ काढला असंही पोलिसांनी सांगितले.
आरोपीनं आमिष दाखवलं
बलात्काराच्या आरोपाखाली ज्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, त्याने पोलिसांना सगळा घटनाक्रमच सांगितला आहे. या प्रकरणातील 50 वर्षाच्या आरोपी देवानंद राय उर्फ भोकलूने सांगितले की, त्या मुली जळणाचे साहित्य आणण्यासाठी ज्यावेळी घरातून बाहेर पडल्या होत्या त्यावेळी त्या आधी गावात आल्या होत्या. मात्र आरोपीने त्यांना जळणाचे साहित्य शेतात असल्याचे सांगत त्यांना तो शेतात घेऊन गेला. त्यावेळी आरोपीने आधी 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.
हे ही वाचा >> Milind Deora : ‘हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है!’, CM शिंदेंनी कुणाला दिला इशारा
दोघींच्या डोक्यात दगड घातला
बलात्कार करून त्याने मुलीच्या डोक्यात दगड घालून तिला आधी ठार केले. त्यानंतर त्याने दहा वर्षाच्य मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड केल्यामुळे त्याने तिच्याही डोक्यात दगड घातला. त्यावेळी मुलगी ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने मुलीचा जीव गेल्याचे समजून त्याने तिथून पळ काढला.
एक ठार एक जखमी
ज्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, त्या दोघींमधील एक मुलीचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. त्या दोघीही मुली घरातील लोकांनी साहित्य आणण्याचे काम सांगितले होते, म्हणून त्या 9 जानेवारी रोजी गावात आल्या होत्या. आलमपूरमधील त्या दोन्ही अल्पवयीन मुली आरोपीच्या घरी गेल्यावर त्याने त्यांना तो शेतात घेऊन गेला. त्यानंतर त्याने आधी आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला व त्यानंतर दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.









