Brij Bhushan Singh अडकणार! दिल्ली पोलिसांनी कोर्टाला ‘ते’ सगळं सांगितलं
महिला कुस्तीपटू प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोर्टात युक्तिवाद केला. ब्रिजभूषण शरण सिंह वर दिल्ली पोलिसांनी गंभीर आरोप केलेत. ब्रिजभूषण शरण सिंहला तो करत असलेल्या कृतीची जाणीव होती, असे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT

Brij bhushan singh delhi police chargesheet : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने ब्रिजभूषण यांना हजर राहण्यापासून सूट दिली होती. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी पोलिसांनी जी माहिती दिली, त्यावरून ब्रिजभूषण कायद्याच्या कचाट्यात अडकणार असंच दिसत आहे.
युक्तिवादात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ब्रिजभूषण यांना माहित होतं की ते काय करत आहेत. जेव्हा-जेव्हा ब्रिजभूषण यांना संधी मिळायची, तेव्हा तेव्हा ते महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करायचे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीने काही प्रतिक्रिया दिली की नाही हा प्रश्न नसून तिची काय चूक झाली हा प्रश्न आहे. सादर केलेले पुरावे ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असंही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी तक्रारदारांचा केला उल्लेख
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी तक्रारदारांसोबत दिल्लीतील WFI कार्यालयात घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आणि सांगितले की, या तक्रारींचे अधिकार फक्त दिल्लीतच आहेत. एका महिला कुस्तीपटूने सांगितले की, ताजिकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान ब्रिज भूषणने पीडितेला खोलीत बोलावले आणि जबरदस्तीने मिठी मारली. पीडितेने त्याला विरोध केल्यावर ब्रिजभूषण म्हणाला की, वडिलाच्या भावनेने हे केले. यावरून बृजभूषण यांना आपण काय करत आहोत हे माहीत असल्याचे स्पष्ट होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
हेही वाचा >> ‘ऐ @#%$…’ भाजप खासदाराची लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ
दुसऱ्या तक्रारदाराच्या तक्रारीचा संदर्भ देत पोलिसांनी सांगितले की, ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान ब्रिजभूषणने पीडितेचा शर्ट परवानगीशिवाय वर उचलला होता आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला होता.










