Crime: बंदुकीचा धाक दाखवून वहिनीवर बलात्कार, नंतर अश्लील व्हिडिओ बनवून…, धक्कादायक घटना
राजस्थानच्या धौलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दीराने बंदुकीचा धाक दाखवून वहिनीवर शेतात बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
राजस्थानच्या (Rajsthan) धौलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दीराने बंदुकीचा धाक दाखवून वहिनीवर शेतात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दीराने वहिनीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकचं नाही तर हा संपूर्ण घटनाक्रम कुणालाही सांगितल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, मात्र अद्याप तिला न्याय मिळाला नाही आहे.(brother in law rape sister in law in gun point shocking crime story from rajasthan)
ADVERTISEMENT
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, माझा नवरा दुसऱ्या राज्यात खाजगी नोकरी करतो. त्यामुळे घरी मी एकटीच असते. गेल्या मार्च महिन्यात मी गव्हाच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा दीराने मागून येऊन मला पकडलं आणि बंदुकीचा धाक दाखवुन माझ्यावर बलात्कार केला. यावेळी दीराने माझे काही अश्लील व्हिडिओ देखील बनवले होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो वारंवार घरात येऊन माझ्यावर बलात्कार करत होता, असे पीडित महिलेने सांगितले.
हे ही वाचा : Sana Khan Murder: नदी, विहीर अन्..; सनाच्या हत्येची चक्रावून टाकणारी स्टोरी!
दीराच्या या सततच्या त्रासाला कंटाळून तिने या संपूर्ण घटनेची माहिती नवऱ्याला दिली होती. यानंतर नवरा आणि पीडीत महिलेने कंचनपूर पोलीस ठाणे गाठून दीराविरोधात तक्रार दिली. या तक्रारीची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी पंचायत बोलावून पीडितेच्या पतीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. याचसोबत पोलिसांना देखील या प्रकरणात कोणतीच कारवाई करू दिली नाही.
हे वाचलं का?
ग्रामस्थांनी भरवलेल्या या पंचायतीत संपूर्ण प्रकरणाचा निपटारा झाला. मात्र तरी देखील दीर सुधरलाच नाही. दीराने भावाला आणि वहिनीला धमकवायचे सुरुच ठेवले. या दरम्यान 30 जून 2023 मध्ये आरोपी दीर त्याच्या इतर साथीदारांसह पुन्हा वहिनीच्या घरात घुसला. आणि वहिनीवर बलात्कार करायचा प्रयत्न केला. मात्र दीर घरात घुसल्याचे पाहताच महिलेने आरडाओरड करायला सुरुवात केली. बायकोच्या ओराडण्याचा आवाज ऐकूण नवऱ्याने घराकडे धाव घेतली. तिथपर्यंत दीर त्याच्या साथिदारांसह फरार झाला होता.या घटनेनंतर पीडित महिलेने आणि तिच्या नवऱ्याने कोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी दीरावर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : Shraddha Walkar : ‘आफताबने गळा दाबून मारले, नंतर…’, वडिलांनी कोर्टात काय सांगितलं?
27 वर्षीय महिलेने काका, सासरे आणि दीराविरोधात बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण दोन महिन्यापूर्वीच आहे. या प्रकरणात न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे, असे कंचनपुर ठाण्याचे एसएसओ योगेंद्र शर्मा यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT